आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal In Movements Begin To Reservation Cancel

अारक्षणावर पाणी फिरण्याची चिन्हे, स्थायी समितीची भूमिका ठरणार निर्णायक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक; मखमलाबाद येथे कचरा डेपाेच्या प्रयाेजनासाठी अारक्षित असलेले जवळपास ४१.८१ हेक्टर क्षेत्रावरील अारक्षण रद्द करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे वृत्त असून, संबंधित जागा तातडीने भूसंपादन करण्यासाठी एकूण प्रस्तावाच्या ५० टक्के म्हणजेच जवळपास ३८ काेटी ८५ लाख रुपयांची रक्कम भूसंपादन कार्यालयात जमा झाल्यास अारक्षण व्यपगत हाेण्याची भीती महापालिका प्रशासनाने व्यक्त केली अाहे.
अार्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे अाता स्थायी समिती माेक्याची जागा भविष्याचा विचार करता ताब्यात ठेवण्यासाठी कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले अाहे.

मखमलाबाद येथे ४१ हेक्टर क्षेत्र कचरा डेपाेसाठी अारक्षित असून, भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यापूर्वीच पाठविण्यात अाला अाहे. नाशिक महापालिकेने या प्रस्तावाच्या अनुषंगाने २००७ मध्ये काेटी ८८ लाख ३० हजार रुपयांची रक्कमही जमा केली. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अतितातडीच्या भूसंपादन प्रकरणासाठी संबंधित रक्कम अन्य भूधारकांना लाभ देण्याच्या अनुषंगाने वर्ग करण्यात अाली. सद्य:स्थितीत भूसंपादनाच्या दृष्टीने काेणतीही रक्कम शिल्लक नाही. दरम्यान, नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे हिशेब केल्यानंतर अाता याच जागेची किंमत ७७ काेटी ७१ लाख ३६ हजार रुपये असून, जागा संपादनासाठी एकूण रकमेच्या पन्नास टक्के म्हणजे जवळपास ३८ काेटी ४५ लाख रुपयांची रक्कम भरणे अपेक्षित अाहे. याच प्रस्तावातील तारादेवी राठी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून २.२७ हेक्टर क्षेत्र अारक्षणातून वगळण्याची मागणी केली हाेती. त्यानुसार उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला अाहे. या निकालाचा अाधार घेऊन अन्य जमीनधारक अारक्षित जागा परत मिळविण्यासाठी दावा दाखल करू शकतात.
या पार्श्वभूमीवर भूसंपादनासाठी तातडीने जागा ताब्यात घेण्याकरिता अधिसूचना प्रसिद्ध करणे गरजेचे असून, त्यासाठी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात ३८ काेटी रुपयांची रक्कम जमा करणे गरजेचे असल्याचा प्रस्ताव मिळकत विधी विभागाने स्थायी समितीसमाेर ठेवला अाहे. सद्य:स्थितीत मखमलाबाद हे शहराच्या अत्यंत माेक्याचे ठिकाण बनले असून, या पार्श्वभूमीवर इतक्या माेठ्या जागेवर पाणी साेडले तर भविष्यात विकासाच्या दृष्टीने अडचण हाेईल, असा सूर व्यक्त हाेत अाहे.

गाेदावरी सफाईचा ठेकाही वादात
दाेन यंत्रांमार्फत दरराेज ५५ हजार रुपये खर्च करून गाेदावरीची स्वच्छता करण्याच्या प्रस्तावाला विराेध हाेण्याची शक्यता अाहे. या प्रस्तावात दरराेज ५५ हजार रुपये भाडे कशापाेटी द्यायचे, याची माहितीच दिलेली नाही. अन्य कामांसाठी कसा खर्च हाेणार, याबाबत स्थायी सदस्यांना कल्पना नसल्यामुळे त्यांच्याकडून प्रस्ताव फेटाळला जाण्याचीच शक्यता अधिक अाहे.

शिवसेनेकडून विराेध हाेण्याची शक्यता
दरम्यान, अार्थिक अडचणीचे कारण देऊन प्रस्ताव फेटाळण्याच्या मुद्याला शिवसेनेकडून विराेध हाेण्याची शक्यता अाहे. मखमलाबादमधील लाेकांचा कचरा डेपाेला विराेध असला तरी जागा ताब्यात घेण्यास नाही. या पार्श्वभूमीवर कचरा डेपाेएेवजी अन्य चांगल्या बाबीसाठी ही जागा वापरता येऊ शकते, असा युक्तिवाद हाेण्याची शक्यता अाहे.