आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-मनसेत महापौरपदासाठी लढत शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीतील सत्ताधा-यांमधील मतभेदाचा फायदा घेत शिवसेनेने भाजपला सोबत घेऊन महापौरपद मिळवण्यासाठी जोर लावला आहे. परिणामी शिवसेना व मनसे या दोघांमधील लढतीत भाजप किंगमेकर ठरणार असून, विधानसभा निवडणुकीच्या तोडावर कॉँग्रेस व राष्ट्रवादी तटस्थ राहण्याची शक्यता आहे.

शनिवारी महापौरपद इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर सेनेतील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. सेनेचे 24 नगरसेवक असून, जनराज्य व माकप मिळून तीन नगरसेवक त्यांना मिळाले आहेत. भाजपच्या 14 नगरसेवकांमध्ये पाच जणांची भर पडू शकते. त्यात अपक्ष दामोधर मानकर, संजय चव्हाण, तसेच जनराज्य आघाडीचे अपूर्व हिरे यांचा समावेश आहे. भाजपचे दिनकर पाटील अशा चौघांमुळे संख्याबळ 18 होईल. पाटील यांच्या पत्नी नगरसेविका असून, त्यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सेना व भाजपमिळून संख्याबळ 44 ते 46 यादरम्यान होईल. दुसरीकडे मनसेचे 39 नगरसेवक असून, भाजपसोबत युती राहिल्यास सहज महापौरपद राखता येईल. मात्र, युती तुटली, तर चार अपक्षांच्या मदतीनेही सत्ता स्थापन करण्यात अडचणी येतील.
विधानसभेसाठी अदलाबदल
महापौरपदासाठी शिवसेनेत सुधाकर बडगुजर, अजय बोरस्तेंमध्ये चुरस रंगणार आहे. जो माघार घेईल त्याला विधानसभा मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे. महापौरपद ज्याच्याकडे जाईल त्याची जागा बदलली जाऊ शकेल.