आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या महासभेतच भाजपची केली काेंडी, विरोधकांना महापौरांकडून चोख प्रत्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्पष्टबहुमतावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपची पहिल्याच महासभेत कसाेटी बघायला मिळाली. सहाएेवजी नऊ प्रभाग करण्याच्या प्रस्तावातील चुका शाेधून काढताना विराेधकांनी प्रशासनाच्या अाडून भाजपवर हल्लाबाेल केल्यामुळे काही काळ महापाैरांबराेबरच सत्ताधाऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र, महापाैर रंजना भानसी यांनी अनुभवाचा फायदा घेत विराेधकांचा हल्ला चाेखपणे परतवला. दरम्यान, दिनकर पाटील यांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारावरून स्वकियांनाच पेचात पकडल्यामुळे भाजपला चांगलाच झटका बसला. मुशीर सय्यद यांनी जुने नाशिकमधील दाेनवेळ पाणीपुरवठा करण्याबाबत अाश्वासन दिल्यानंतर फुकट अाकाडतांडव करीत सभात्याग करून सत्ताधाऱ्यांना काेंडीत पकडले. 
 
हल्लाबाेल |विराेधकांना महापाैरांकडून चाेख प्रत्युत्तर, पाणीप्रश्न स्वकियांच्या विराेधाचीच चर्चा 
माजी उपमहापाैर गुरुमित बग्गा यांनी प्रशासनाला काेंडीत पकडत नऊ प्रभाग समित्यांसाठी लाेकसंख्या किती गृहित धरली असा सवाल केला. २०११ मधील जनगणनेनुसार १४ लाख ८६ हजार असल्याचे उपअायुक्त विजय पगार यांनी सांगितले. त्यावर बग्गा यांनी प्रभागनिहाय समायाेजनेसाठी दिलेल्या लाेकसंख्येचा हिशेब केला तर त्यात चूक असल्याचे सांगितले. त्याची पडताळणी केल्यावर त्यात खराेखरच तफावत अाढळली. त्यामुळे विराेधकांनी प्रस्ताव चुकीचा असल्याचे सांगत रद्द करण्याची मागणी केली. नियमानुसार दहा प्रभाग समित्या अस्तित्वात अाणणे गरजेचे असून, तसे केल्यास पालिका अधिनियमाचा भंग हाेईल, अशी भीती बग्गा यांनी व्यक्त केली. त्यानंतर माजी विराेधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी थेट बाउन्सर टाकला. प्रस्ताव ज्या महापालिका अधिनियम २६ अन्वये ठेवला ताेच मुळात चुकीचा असल्याकडे लक्ष वेधले. महापालिका अधिनियम २६ हा भलताच असल्यामुळे सारेच चक्रावले. अखेर प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव तपासल्यावर चूक कबुल केली. मात्र २६ एेवजी २९ वा अधिनियम असून प्रिंटिंग मिस्टेकचा परिणाम असल्याची सारवासारव केली. प्रशासनाकडून प्रस्ताव तपासताच सादर केले जात असल्याच्या मुद्यावरून जाेरदार गदाराेळ झाला. अखेर पगार यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर पडदा पडला. 
 
महापाैर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली विकासकामांच्या अनुषंगाने पहिलीच महासभा शनिवारी झाली. भाजपचे बहुमत असले, तरी विराेधी पक्षात अनेक मातब्बर असल्यामुळे भाजपची काेंडी करण्याचा प्रयत्न हाेण्याचा सूर व्यक्त हाेत हाेता. अाणि त्याप्रमाणेच सुरुवातीपासून विराेधकांनी जाेरदार हल्लाबाेल केला. सहा प्रभाग समित्यांएेवजी नऊ प्रभाग समित्या करण्याबाबत प्रस्तावावर चर्चा सुरू झाल्यावर शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी अपुरे मनुष्यबळ, प्रशासकीय खर्चाचे कारण देत त्यास विराेध केला. त्याएेवजी महापालिकेत अाराेग्य, शहर सुधार विधी विभागाच्या विषय समित्या स्थापन करण्याची मागणी केली. ११९२ मध्ये या समित्या अस्तित्वात असल्याचे सांगत या समित्यांची स्थापना करा, असे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी नऊ प्रभाग समित्या कार्यान्वित करण्याची मागणी करीत विराेधी पक्षातील शिवसेनेला झटका दिला. वाढत्या लाेकसंख्येमुळे कामाची अतिरिक्त ताण अाला अाहे. काही विभागात कमी प्रभाग काही ठिकाणी जास्त असे विचित्र समीकरण असून प्रत्येक विभागात समान प्रभागाची रचना करून नऊ प्रभाग समित्या कार्यान्वीत करण्याची त्यांनी मागणी केली. दरम्यान, भाजपकडून गटनेते संभाजी माेरूस्कर, शशीकांत जाधव, उद्धव निमसे, दिनकर अाढाव यांनी सहा प्रभाग ‘जैसे थे’ ठेवावे, अशी मागणी करीत अपुरे मनुष्यबळ, अास्थापना खर्च अन्य कारणे दिले. 
 
वाढीव प्रभागांसाठी कार्यालयापासून तर अन्य सुविधा काेठून द्यायचा असा प्रश्न असल्यामुळे प्राप्त परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा अशी सूचना केली. 
 
सत्ताधाऱ्यांना इशारा अाणि परतफेड : हेमलतापाटील यांनी वेळेत महासभा सुरू झाली पाहिजे, अाधीच्या सभेचे इतिवृत्त पुढील सभेत मंजुरीसाठी ठेवलेच पाहिजे. महासभा तहकूब करताना उगाच फालतू काेणते कारण देऊ अशी महापाैरांची शिकवणी सुरू केली. मात्र त्यावर महापाैरांनी चाेख उत्तर देत सभा वेळेवर सुरू हाेईल, मात्र नगरसेवकांनीही लवकर अाले पाहिजे असे सुनावले. विराेधी पक्षनेता अजय बाेरस्ते यांनीही सभा तहकुबीसाठी नियमावली तयार करावी, नगरसेवकांनी वेळेवर यावे तसेच प्रशासनाच्या चुकीच्या प्रस्तावांना चाप लावण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असल्याचे सांगत भाजपला टाेमणे मारले. 
बातम्या आणखी आहेत...