आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे १८ नगरसेवक राजधडे घ्यायला रवाना, महत्त्वाची पदे देऊनही चार नगरसेवक पुन्हा संपर्काबाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणशिंग फुंकण्याकरिता, तसेच अाहे त्या नगरसेवकांचे मनाेबल उंचावण्यासाठी पनवेलमधील अायुष रिसाॅर्टमध्ये राज ठाकरे यांनी अायाेजित केलेल्या दाेनदिवसीय कार्यशाळेसाठी नगरसेवकांची जमवाजमव करता करता स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या चांगलेच नाकीनऊ अाल्याचे वृत्त अाहे. कशीबशी अठरा नगरसेवकांची कुमक पनवेलला रवाना झाली असून, पक्षाने महत्त्वाची पदे दिली असताना चार ते पाच नगरसेवक संपर्काबाहेर असल्यामुळे चिंता वाढली अाहे.
लाेकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर मनसेत झालेली पडझड अद्याप थांबलेली नाही. माेठ्या प्रमाणात विकासकामे हाेत असताना पुढील निवडणुकीत पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी केल्यास जिंकण्याची शाश्वती वाटत नसल्यामुळे नगरसेवकांची चलबिचल वाढली अाहे. त्यातून मध्यंतरी पक्षाचे प्रथम महापाैर यतिन वाघ यांच्यासह काही नगरसेवकांनी शिवसेनेची वाट धरली तर काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीच्या पहिल्या वर्षी मनसेचे ४० नगरसेवकांचे संख्याबळ अाता जेमतेम २० ते २२ इतके झाले अाहेे.

अशातच निवडणूक ताेंडावर असल्यामुळे जाणाऱ्यांविषयी फारशी चिंता करण्याचे साेडून अाहे त्या मुद्यावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जात अाहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेलमध्ये ठाकरे यांनी २९ जून ते जुलै अशी तीनदिवसीय कार्यशाळा ठेवली असून, त्यात स्मार्ट सिटीपासून तर निवडणूक लढण्यापर्यंत अनेक मुद्यांवर तज्ज्ञांकडून नगरसेवकांना मार्गदर्शनही केले जाणार अाहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नगरसेवकांचे मनाेधैर्य वाढवण्याचाही प्रयत्न अाहे. या कार्यशाळेसाठी नाशिकमधून बसद्वारे नगरसेवक शहर पदाधिकाऱ्यांना रवाना करण्यात अाले.

प्रामुख्याने महापाैर अशाेक मुर्तडक, उपाध्यक्ष राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती सलीम शेख, डाॅ. प्रदीप पवार यांच्यासह जवळपास १८ नगरसेवकांची कार्यशाळेसाठी उपस्थिती असल्याचे सांगितले जाते. या कार्यशाळेसाठी सध्या पक्षात असूनही पंचवटीतील तीन नगरसेवकांनी दांडी मारल्याची बाबही चर्चेचा विषय ठरली अाहे.

मेक ओव्हर आणि इमेज मेकिंगही
मतांचा जोगवा देऊनही मनसे पंचवार्षिक कालावधीत निदान आजवर नाशिककरांच्या पदरात फारसे काही देऊ शकलेली नाही. त्यामुळे नाही म्हटले तरी, तोंडावर आलेल्या पालिका निवडणुकीत ही बाब मनसेच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते. त्या पार्श्वभूमीवर ‘मेक ओव्हर’ आणि ‘इमेज मेकिंग’साठी करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...