आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Smart App First Week In 8 % Use

पालिकेच्या स्मार्ट अॅपचा पहिल्या अाठवड्यात आठ टक्केच वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-अत्यंतदिमाखात सुरू केलेल्या ‘स्मार्ट नाशिक अॅप’ला पहिल्या अाठवड्यात तरी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र अाहे. प्रशासनाच्या दाव्यानुसार १० हजार नागरिकांनी अॅप डाउनलाेड केला असला तरी प्रत्यक्षात त्याच्या आठ टक्के, म्हणजे जवळपास ८३३ तक्रारी अाल्या अाहेत. विशेष म्हणजे, किती तक्रारींचे निराकरण झाले याचे अपडेट प्रशासनाकडे नाही. साधारण ५० टक्क्यांपर्यंत समस्या सुटल्या असतील, असा ढाेबळ अंदाज व्यक्त केला जात अाहे.
स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नाशिक महापालिकेचेे स्मार्ट अॅप १५ सप्टेंबरपासून कार्यान्वित झाले आहे. नागरिकांना महापालिकेत खेट्या मारण्याची वेळ येऊ नये प्रामुख्याने गटार, वाॅटर मीटरशी संबंधित तक्रारी झटपट सुटाव्यात, यासाठी स्मार्ट अॅप प्रभावी ठरेल, असा डंकाही पिटला गेला. स्मार्ट अॅपची प्रसिद्धी माेठ्या प्रमाणात झाल्यामुळे डाउनलाेड करून प्रत्यक्ष वापर करण्याची तयारी टेक्नाेसॅव्ही नाशिककरांनी केली. जेमतेम अाठवडाभरात १० हजार नागरिकांनी हा अॅप डाउनलाेड केल्याचा दावाही केला जात अाहे. प्रत्यक्षात केवळ उत्सुकतेपाेटी म्हणा किंवा नियमित वापराच्या दृष्टीने तक्रार करणाऱ्यांची संख्या कमीच अाहे.

अॅक्सेसमुळेहीमर्यादा... : स्मार्टअॅपवर येणाऱ्या तक्रारींचे स्वरूप एकत्रितरीत्या पाहण्याची सुविधा नाही. या अॅपच्या नियंत्रणाचे सुकाणू ज्या उपायुक्तांकडे अाहे, त्यांनाच ते बघण्याचा अॅक्सेस नसल्याचे माध्यम प्रतिनिधींनी विचारल्यानंतर उघड झाले. अनेक तक्रारींची पूर्तता करण्याची बाब अार्थिक अक्षमता वा धाेरणात्मक निर्णयासारख्या बाबींमुळे अशक्य अाहे. अशा तक्रारी शेवटी संबंधित कारणे देऊन निकाली काढल्या जात असल्यामुळे संबंधित कामे वा समस्या सुटली असे कसे म्हणता येईल, हा प्रश्न अाहे. उदाहरणादाखल, काेणी रस्त्याची मागणी केली तर संबंधित कामासाठी निधीपासून तर अन्य सर्व मंजुरी प्रक्रिया माेठी अाहे. विद्युत विभागाच्या सर्वाधिक तक्रारी असून, यात प्रामुख्याने पथदीपांशी संबंधित विषय असण्याची शक्यता अाहे. एलईडीचा निर्णय प्रलंबित असल्यामुळे विद्युत साहित्य कसे पुरवणार, हा प्रश्न अाहे. अशा समस्यांवर प्रशासन काय उत्तरे देते, यावर अॅपची यशस्वी-अयशस्वीतता अवलंबून अाहे.

भुयारी गटार ७३
पाणीपुरवठा ५९
उद्यान ५६
विद्युत ३३६
अाराेग्य १६०
बांधकाम १२१

अनेक प्रकारची मािहती
गुगलमधीलप्ले स्टाेअरमध्ये स्मार्ट अॅप सहज उपलब्ध हाेतो. नाेंदणीनंतर अनेक पर्याय उपलब्ध हाेतात. केवळ तक्रारीच नव्हे, तर विविध परवानग्या संबंधित विभागांची माहितीही तेथे मिळते.