आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेत २४९ कर्मचाऱ्यांचा खांदेपालट, तीन सहायक अायुक्तांना दणका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अनेक वर्षांपासून एकाच टेबलवर चिकटून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास महापालिकेने प्रारंभ केला अाहे. यानुसार साेमवारी पालिकेतील ११ संवर्गांतील २४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान, कनिष्ठ वरिष्ठ लिपिकांना वसुलीवर परिणाम हाेईल म्हणून एप्रिलपर्यंत बदल्यांमधून सवलत दिली अाहे. दुसऱ्या टप्प्यात खासकरून यांत्रिकीशी संबंधित ५३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या हाेतील, असे उपअायुक्त विजय पगार यांनी जाहीर केले.
अनेक दिवसांपासून पालिकेत कर्मचाऱ्यांच्या खांदेपालटाची चर्चा हाेती. सिंहस्थानंतर अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी ही बाब मनावर घेत प्रशासनाला कारवाईचे अादेश दिले हाेते. त्यामुळे पालिकेत बदली टाळण्यासाठी जाेरदार लाॅबिंग हाेती. दरम्यान, बदली प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात २४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर अायुक्तांनी शिक्कामाेर्तब केले. तीन वर्षांपेक्षा ज्यांचा कालावधी अधिक त्यांना हलवण्यात अाले. बदल्यांसाठी कालावधी धरताना भले अाता पदाेन्नती झाली असेल, मात्र यापूर्वीचा कालावधी संबंधित विभागात घालवला असेल तर त्यांच्याही बदल्या करण्यात अाल्या. १११० कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित असून, ३५५ कनिष्ठ वरिष्ठ लिपिकांच्या एप्रिलनंतर बदल्या हाेतील, असेही सांगितले. या सर्व कर्मचाऱ्यांना बुधवारपासून नवीन अास्थापनेवर रुजू व्हावे लागणार असून, २९ जानेवारीपर्यंत अाढावा घेऊन जे कर्मचारी हजर हाेणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई होईल, असे पगार यांनी स्पष्ट केले.

नगररचनात अाता ‘परीक्षा’: नगररचनािवभागात बांधकाम परवानगीशी संबंधित महत्त्वाची कामे हाेत असल्याने येथे पदस्थापना मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यापासून तर अभियंत्यांची धडपड असते. मात्र, अाता अशी जबाबदारी देताना अतिक्रमणे काढण्यासंदर्भातील टार्गेटही अभियंत्यांवर साेपवण्यात अाले अाहे. पद निर्देशित अधिकारी अशी संकल्पना सुरू झाली असून, त्याद्वारे प्रत्येकाच्या कामाचे मूल्यमापन हाेणार असल्याचे पगार यांनी स्पष्ट केले.
मुख्यालयातील तीन सहायक अायुक्तांना विभागीय अधिकाऱ्यांच्या पदावर पाठविले अाहे. दरम्यान, नाशिक पूर्वच्या प्रभारी विभागीय अधिकारी मालिनी शिरसाठ यांची तेथेच अधीक्षक अास्थापना, नाशिकराेड विभागीय अधिकारी कुसुम ठाकरे यांची पश्चिम विभाग अधीक्षक अास्थापना, तर सातपूरचे प्रभारी विभागीय अधिकारी महेंद्र पगारे यांची अतिक्रमण मुख्यालय अधीक्षक अास्थापना या ठिकाणी बदली करण्यात अाली अाहे. दरम्यान, विभागीय अधिकारी जयश्री साेनवणे यांना बढती देत मुख्यालयात विविध कर, महिला बालकल्याण, नाट्यगृह-स्मारके, कामगार कल्याण, जनसंपर्क अशा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी दिली अाहे.