आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या पाण्यात हाेणार १५६९ दलघफू कपात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आधीच दुष्काळ त्यातच गंगापूर धरण समूहातच पाणी नसताना जायकवाडीला १.३६ टीएमसी पाणी साेडावे लागल्यामुळे अखेर नाशिक महापालिकेसाठी अारक्षित करण्यात येणाऱ्या पाण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५६९ दशलक्ष घनफुटांनी कपात हाेण्याची शक्यता अाहे. पाणी अारक्षणाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्यास मनपाला वर्षभरासाठी अवघे हजार ९३१ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध हाेईल त्यामुळेआता नाशिककरांना दिवसातून एकदाच आणि जानेवारीनंतर तर एक दिवसाआड पाणीपुरवठा हाेेणार, यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे.

यापूर्वी दोनदा रद्द झालेली पाणी आरक्षणाची बैठक शनिवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यात सध्याच्या उपलब्ध पाणी साठ्यातच सर्वांची गरज भागवावी लागेल, असेच नियाेजन केले जाईल. सध्या गंगापूर धरण समूहात हजार २१३ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. तो गेल्यावर्षी हजार ४३६ दशलक्ष घनफूट इतका होता. म्हणजे तुलनेत ताे बरोबर निम्मा आहे. त्यामुळे वापरासाठीही निम्मेच पाणी मिळणार आहे. उपलब्ध पाण्याचा विचार केला तर महापालिकेला गेल्या वेळी ४५०० दशलक्ष घनफूट पाणी मिळाले होते. यंदा त्यात दीड हजार दशलक्ष घनफुटाने कपात हाेऊन ते फक्त २९३१ दशलक्ष घनफूट इतकेच मिळेल. मात्र, यात गंगापूर डाव्या कालव्यावरील द्राक्षबागांचा विचारच केला गेलेला नसल्यामुळे त्यावरून बैठकीतच गदारोळ हाेण्याची शक्यताही वर्तविली जात अाहे.

३८८५ दलघफू पाण्याची मागणी...
अाैद्योगिक वसाहतीसाठी २००, एकलहरे वीज केंद्राला ७००, पिंप्री सय्यद पाणी योजनेसाठी २८, कसबे सुकेणेसाठी ३, त्र्यंबकनगर परिषदेला १३ तर दिक्षी, ओणे, थेरगावसह गावांना अशी एकूण ३८८५ दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी आता केली गेलेली अाहे.