आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौर जयासाठी मनसेना जयपूरकडे;सावधगिरी नगरसेवकांची आप्तजनांसह हवाई सफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापौर पदासाठीशिवसेनेकडून फोडाफोडीचे प्रयत्न हाण्‍याची शक्यता लक्षात घेऊन मनसेचे ३९ नगरसेवक त्यांच्या कुटुंबीयांसह ८० जणांची सहल मुंबईमार्गे राजस्थानकडे रवाना झाली. मुंबईहून जयपूरला विमानाने नेले जाणार असून, यानिमित्ताने मनसे नगरसेवकांना सहकुटुंब हवाई सफरीचा आनंद मिळणार आहे. दिवसेंदिवस राजकीयदृष्ट्या अडचणीत येणा-या मनसेने ‘जय’पूरची सहल विजयाचे गणित हमखास जुळवून आणेल, असा हिशेब मांडल्याचे सांगण्यात येत आहे.

महापौरपदाची निवडणूक १२ सप्टेंबरला होणार असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. मात्र, मंगळवारीच मनसेचे दोन नगरसेवक ‘गायब’ झाल्याने आमदार वसंत गिते यांनी ‘राजगड’ येथे नगरसेवकांची बैठक घेऊन एकत्र राहण्याचे आदेश दिले. महापौरपदाच्या निवडणुकीत अजिबात दगाफटका नको, असा स्पष्ट निरोपच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून ‘कृष्णकुंज’वरून आल्याने मनसे नगरसेवकांच्या सहलीचा बेत आखण्यात आला.
गिते यांच्या निवासस्थानी दिवसभर घडामोडी झाल्यावर रात्री नऊ वाजेच्या सुमारास सर्व नगरसेवकांची जमवाजमव करण्यात आली. नगरसेविकांनी त्यांचे पती, तर काही नगरसेवकांनी पत्नी मुलांनाही सोबत घेतल्याचे समजते. रात्री उशीर झाल्यानंतर कसारा-मुंबईदरम्यान एका रिसॉर्टमध्ये मुक्कामाचे नियोजन सुरू होते. सकाळी मुंबईत पोहचल्यानंतर विमानाने नगरसेवकांना राजस्थानची राजधानी जयपूरला नेले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या वेळी प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.
तातडीने हजर होण्याचा आदेश येताच अनेक नगरसेविका लगबगीने मुला-बाळांसह दाखल झाल्या. निवडणुकीचे व्हायचे ते होईल, तूर्तास जयपूरची हवाई सहल एन्‍जॉय करण्याचा आनंद ‘ताई-माईं’च्या चेह-यावर विलसत होता. दरम्यान, आमदार वसंत गिते, नगरसेवक गुलजार कोकणी महापौरपदाचे एक इच्छुक अशोक मुर्तडक यांच्यात सहलीच्या नियोजनाबरोबरच निवडणुकीची रणनीतीही आखली जात होती. दुसरीकडे, गाडीच्या काचेवरील ‘एक्झिट’ विद्यमान महापौरांची अवस्था स्पष्ट करीत होती.