आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योग बाहेर चालले, आता तरी लक्ष द्या, महापौरांनी दिले तत्काळ कामांचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेला आर्थिक हात देणा-या औद्योगिक वसाहतीतील खराब रस्ते, भूमिगत गटारी यासारख्या विविध समस्यांचा पाऊसच उद्योजकांनी महापौरांसमोर पाडला. ‘गेल्या काही दिवसांत चार मोठे उद्योग बाहेर स्थलांतरित झाले, आता तरी लक्ष द्या’, अशा शब्दांत महापौर यतिन वाघ यांना साकडे घालण्यात आले. महापैरांनी तत्काळ प्रत्येक प्रश्नासंदर्भात आवश्यक उपाययोजना परवानगीसाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करण्याचे आदेश अधिका-यांना दिले.
महापौर दालनात जिल्हा उद्योग केंद्र समितीच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत प्रामुख्याने खराब रस्ते गटारींचाविषय गाजला. ‘अंबड सातपूर औद्योगिक वसाहतीतील अनेक रस्ते उखडल्याने पावसाळ्यात कंटेनर, ट्रक रुतून पडण्याचे प्रकार घडत आहेत. तेथे अक्षरश फलकाद्वारे वाहने चालवू नका, अशी सूचना देण्याची वेळ आल्याचे उद्योजकांनी सुनावले. त्यावर शहर अभियंता सुनील खुने यांनी १५ कोटी रुपयांची कामे मंजूर असून, एक कोटी रुपये दुरुस्तीसाठी दिले जाणार असल्याचे सांगितले. सद्यस्थितीत खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून, नोव्हेंबरनंतर डांबरीकरण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एमआयडीसीकडे महापालिकेच्या झालेल्या दुर्लक्षामुळे व्हीनस वाणी यांनी भविष्यात घरपट्टी मलनिस्सारण कर भरण्याचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला.
या वेळी जिल्हाधिकारी विलास पाटील, महापालिका प्रभारी आयुक्त सोनाली पोंक्षे- वायंगणकर यांच्यासह निमा, आयमा संघटनेचे पदाधिकारी उद्योजक उपस्थित होते.

प्रकाशासाठीशंभर खांब बदलणार : औद्योगिकवसाहतीतील ५० टक्के पथदीप बंद असल्याची तक्रार उद्योजकांनी केली. त्यावर महापौरांनी विद्युत विभागाचे अभियंता वसंत लाडे यांना खुलासा करण्याचे आदेश दिले. त्यांनी निविदा काढून शंभर खांब बदलले जातील, असे स्पष्ट केले. पथदीपांची तात्पुरती दुरुस्ती सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, उद्योजकांनी पथदीप बंद पडतात असे सांगूनही तुम्ही लक्ष का देत नाही, असा सवाल केला.
ठेकेदारांना नोटीस
एमआयडीसीतीलतीन-चार किलोमीटरचे रस्ते गेल्या वर्षी केले असून, या रस्त्यांची ठेकेदार दुरुस्ती का करीत नाही, असा प्रश्न विचारताना रमेश पवार, व्हीनस वाणी आक्रमक झाले. त्यावर ठेकेदारांना नोटिसा दिल्या असून, तीन वर्षे दुरुस्तीची जबाबदारी त्यांचीच असल्याचे खुने यांनी सांगितले. उद्योजकांनी प्रत्येक रस्त्यावर मक्तेदार, निर्मिती, दुरुस्तीच्या कालावधीचे माहिती फलक लावण्याच्या सूचनाही केल्या.