आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यांनी झाली रस्त्यांची चाळणी, डागडुजीपेक्षा प्रभावी उपाययोजनांची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर- सातपूर औद्यागिक वसाहत त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राकडे जाणा-या भाविकांच्या वाहनांची वर्दळ वाढल्याने सातपूरच्या रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्याची नेहमीच डागडुजी करून नाशिककरांचे पैसे मातीमोल केल्यापेक्षा प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सातपूर-त्र्यंबकेश्वर या मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते .नागरिकांची ओरड बघून, प्रशासनाने अनेक वेळा खड्ड्यांमध्ये माती टाकून ते बुजविण्याचे काम केले. मात्र तुरळक पाऊस होताच पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती होते. नेहमीच्याच या त्रासामुळे वाहनधारकांना हाडांशी संबंधित विविध आजाराचा सामना करतानाच वाहनांच्या दुरुस्तीचा खर्चदेखील सोसावा लागत आहे.
पावसाने उघडीप दिल्यानंतर प्रभावी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन तत्कालीन महापौर अॅड. यतिन वाघ यांनी दिले होते. मात्र, पाऊस उघडल्यानंतर प्रभावी उपाययोजना करण्यापेक्षा पुन्हा वरवर मलमपट्टी केली जात असल्याने नाशिककरांचे पैसे दरवर्षी खड्ड्यांत जात आहेत. रस्त्यावर माेठमाेठे खड्डे खाेदून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सद्यस्थितीत हाती घेतले असले, तरी या कामाच्या दर्जाबाबतदेखील साशंकताच अाहे.प्रशासनाने रस्त्याच्या कामासाठी प्रभावी उपाययोजना राबवावी शहरात खड्डेमुक्त रस्त्यांची निर्मिती करावी अशी मागणी होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची मलमपट्टी होते, मात्र ठोस उपाययोजना केली जात नाही.