आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निवडणुकीसाठी 31 प्रभागांत 61.60 टक्के मतदान, रात्री उशिरापर्यंत चालले मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी  मंगळवारी (दि. २१) ६१.६० टक्के इतके मतदान किरकाेळ अपवाद वगळता शांततेत पार पडले. विशेष म्हणजे, यंदा माेठ्या प्रमाणात मतदार जागृती झाल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा हाेती. प्रत्यक्षात एकाच कुटुंबातील सदस्यांचे त्यांच्या घराजवळील मतदान केंद्रावर एकाचे नाव, तर दाेन दाेन किमी अंतरावरील मतदान केंद्रावर दुसऱ्याचे नाव अशा विचित्र विभागणीमुळे मतदारांना मनस्तापाचा सामना करावा लागला. त्यातून काहींनी मतदान केले तर काहींनी अघाेषित बहिष्कार टाकून घरचा रस्ता पकडला. 
 
महापालिका निवडणुकीसाठी यंदा माेठ्या प्रमाणात मतदार जागृती करण्यात अाली हाेती. त्यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा हाेती. मागील निवडणुकीचा अालेख लक्षात घेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नानाविध उपाययाेजना हाेत्या. प्रत्यक्षात सकाळपासून मतदारांचा प्रतिसाद कमीच हाेता.
 
सकाळी नाशिकमध्ये सरासरी ७.१५ टक्के मतदान झाले. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता १८.५० टक्के मतदान, तर दुपारी दीड वाजता ३०.६३ टक्के मतदान झाले. दरम्यान, दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढू लागली. खासकरून झाेपडपट्टी परिसरातील मतदार बाहेर पडू लागल्यामुळे दुपारी साडेतीनपर्यंत ४३.३३ टक्के मतदान झाले. त्यानंतरही सायंकाळपर्यंत मतदारांची माेठ्या संख्येने गर्दी हाेती. बूथमध्ये दाखल मतदारांना अात घेत त्यानंतर बाहेरील प्रवेशद्वार बंद करून घेतले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू हाेती.
 
अभिनव बालमंदिरात अायाेगामुळेच खुला प्रचार: अभिनव बालविकास मंदिर शाळेतील मतदान केंद्रांवर दुपारी मुख्य निवडणूक अायुक्त दीपक कपूर यांनी भेट दिल्यानंतर गैरसमजातून चक्क खुला प्रचाराचा प्रकार सुरू झाला. मतदान केंद्राबाहेरील बॅलेट पेपर कपूर यांनी कर्मचाऱ्यांना मतदार जागृतीसाठी बुथमध्ये नेण्याचे अादेश दिले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या मतदारांना कशा पद्धतीने बॅलेटनिहाय मतदान करायचे याबाबत प्रबाेधन सुरू केले. त्यात उदाहरणादाखल राजकीय पक्षांचे उमेदवारांकडे बाेट ठेवले जात असल्यामुळे सेनेने त्यास हरकत घेतली. त्यानंतर ही बाब अायुक्त कृष्णा यांनी कळल्यावर त्यांनी तातडीने बॅलेट हटवण्याचे अादेश दिले.

३ टक्के वाढले मतदान
२००७ मध्ये ६० टक्के मतदान झाले हाेते मात्र २०१२ मध्ये ५७.१८ टक्के मतदान झाले. यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न झाल्यामुळे तीन टक्के वाढ झाल्याचे दिसून अाले. विशेष म्हणजे यंदा ७० हजार नवमतदार हाेते. गेल्यावेळी ५ लाख ७३ हजार ५८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला हाेता. यंदा ६ लाख ६१ हजार १९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदान यंत्रांची दाणादाण
मतदान करण्यापूर्वी तपासणी करताना प्रभाग ६, २९ व ३१ मधील मतदान यंत्रे बंद पडली. यात प्रभाग २९ मधील २ बूथमधील यंत्रे बंद पडली तर प्रभाग २ मधील २२, प्रभाग ३ मधील ३६, प्रभाग ६ मधील २५, प्रभाग २५ मधील ७ तर प्रभाग ९ मधील २४ बूथवरील यंत्रे मतदान सुरू असताना बंद पडली. याव्यतिरिक्त, प्रभाग क्रमांक २६ मध्ये बूथ क्रमांक ७, प्रभाग क्रमांक १३ मध्ये बूथ ५०, प्रभाग क्रमांक १५ येथे बूथ क्रमांक ६ मधील मतदान यंत्रे बंद पडल्यामुळे गाेंधळ उडाला. यातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये तर दीड तास यंत्रे बंद पडल्याचे सांगितले जात हाेते.

येथे रात्री उशिरापर्यंत चालले मतदान
महापालिकेचे मतदान सकाळी साडेसात तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हाेणार हाेते. मात्र साडेपाच वाजता मतदान केंद्रात दाखल झालेल्या मतदारांचे मतदान हाेईपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार हाेती. त्यानुसार प्रभाग ३, ४, ९, ११, १२, १३, १४, १५, २७, २९, ३०, ३१ येथे माेठ्या संख्येने मतदार असल्यामुळे उशिरापर्यंत मतदान चालले.
 
अाता मतमाेजणीकडे लक्ष
मतदानानंतर लक्ष लागले अाहेत ते अाता गुरुवारी हाेणाऱ्या मतमाेजणीकडे. गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमाेजणी सुरू हाेणार असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या अखत्यारीतील प्रभागात जाे प्रथम असेल त्यापासून सुरुवात हाेईल. त्यातील चार जागांसाठी मतमाेजणी झाल्यानंतर दुसऱ्या प्रभागाची माेजणी हाेईल. एका प्रभागासाठी दीड तास अपेक्षित असून एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जास्तीत जास्त ३ प्रभाग अाहेत. या पार्श्वभूमीवर दुपारी १ ते २ वाजेपर्यंत पालिका काेणाची हे स्पष्ट हाेईल.

लक्ष्मीदर्शन राेखण्यासाठी दाेन्ही अायुक्त फिल्डवर
महापालिका निवडणुकीत यंदा माेठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शनाचे प्रयाेग हाेतील अशी अटकळ हाेती. ही शक्यता लक्षात घेत पाेलिस अायुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल व महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी व्हीजिलन्स स्क्वाॅडबराेबर प्रत्यक्ष फिरून गैरप्रकार राेखण्याचे प्रयत्न केले.
बातम्या आणखी आहेत...