आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासभेमध्ये जादा विषयात भाजपने उडवला 257 काेटींच्या रस्त्यांचा बार, विनाचर्चा मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महासभेत विराेधकांनी सुरुवातीला गाेंधळ घालायचा, विनाकारण एखाद्या विषयावर लांबलचक चर्चा हाेऊ द्यायची त्यानंतर जादा विषयांतील धाेरणात्मक प्रस्तावांना ‘विकासकामांचे’ गाेंडस नाव देऊन विनाचर्चा मंजूर करण्याचे भाजपचे सुरूच असून, साेमवारच्या महासभेत २५७ काेटी रुपये खर्चून शहरात डांबरी रस्ते करण्याचा प्रस्ताव जादा विषयात विनाचर्चाच मंजूर करण्यात अाला. भाजपने दिन दिन दिवाळी म्हणत रस्त्यांचा बार फाेडल्यानंतर शिवसेनेसह विराेधकांनी अळीमिळी गुपचिळी असे धाेरण स्वीकारत अाक्षेप घेणेही टाळले. 
 
शिवसेनेने स्वीकृत नगरसेवक नियुक्तीच्या मुद्यावरून गाेंधळ सुरू केल्यानंतर दहा मिनिटे महासभा तहकूब करण्यात अाली. त्यानंतर सर्व विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करून भंगार बाजाराचा विषय पटलावर नसलेल्या चर्चेला हिरवा कंदील दाखवण्यात अाला. तब्बल दाेन तासांहून अधिक निरर्थक चर्चा झाल्यानंतर विषयपत्रिकेवरील पहिल्या तीन प्रस्तावांवर चर्चा झाली. त्यानंतर विकासकामांच्या नावाखाली २५७ काेटी खर्चून गरज असलेल्या ठिकाणी डांबरी रस्ते करण्याचा प्रस्ताव जादा विषयात मंजूर केला. 
 
सारे काही रस्त्यांसाठी 
मनसेच्याकाळात सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमित्त साधून केंद्र, राज्य महापालिकेने तयार केलेल्या कृती अाराखड्यातून ४०० काेटींची रस्त्यांची कामे झाली. यात अंतर्गत बाह्य रिंगराेडचा समावेश हाेता. त्यानंतर मनसेने शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसह अस्तरीकरणासाठी १९२ काेटींची कामे मंजूर केली. त्यास जेमतेम अाठ ते दहा महिनेच झाली अाहेत. अाता भाजपने २५७ काेटी रुपयांचे रस्ते मंजूर केले असून, हे रस्ते नेमके काेठे कसे हाेणार याबाबत तपशील दिलेला नाही. 
 
भाजपविषयी वाढला संशय 
मागीलमहासभेत रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, डंपरसह अन्य साहित्य भाडेतत्त्वावर घेण्यासाठी ३७ काेटी रुपयांचा प्रस्ताव विनाचर्चा मंजूर करण्यात अाला. दरम्यान, अाता भाजपने साेमवारच्या महासभेत रस्ते डांबरीकरणाचा प्रस्ताव विनाचर्चाच मंजूर केला. वास्तविक शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असल्याने त्याची घाेषणा अपेक्षित हाेती. प्रत्यक्षात, गुपचूप विषय मंजूर केला. यात किती काेटींचे डांबरीकरण अाहे, याबाबत महापाैरांनाही माहिती नव्हती. पत्रकारांनी िचारल्यानंतर त्यांनी गटनेते माेरूस्कर यांना विचारणा करीत कामांची रक्कम जाणून घेतली. 

अाता अायुक्तही राजी.... 
नगरसेवकनिधी देताना ७५ लाखावरून ४० लाख रुपयांपर्यंत ताणून धरणारे अायुक्त कृष्णा हे देखील अाता २५७ काेटींच्या कामांचे समर्थन करीत अाहेत. वाढीव नगरसेवक निधीमुळे ३० काेटींचाच बाेजा पडला असून, मागील २०० काेटींची कामे रद्द केल्याने वाढीव कामांसाठी निधी उपलब्ध हाेईल, असा विश्वास व्यक्त केला. गेल्या वर्षी १९२ काेटींचे रस्ते साधारण ४५ लाख रुपये नगरसेवक निधीमुळे २५० काेटींपर्यंत खर्च अपेक्षित हाेता. यंदा मात्र, त्यात शंभर काेटींची वाढ हाेणार असली तरी, यावर्षी केवळ २५ टक्केच निधी खर्ची पडणार अाहे. त्यामुळे सर्व सुरळीत हाेईल, असे अायुक्तांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...