आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डुक्करमुक्तीसाठी अाता पायलट प्राेजेक्ट, महिन्याला 200 डुकरे पकडण्याचे कंत्राटदाराला उद्दिष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्वाईन फ्लूसह राेगराईचे कारण ठरणारी, तसेच शहराच्या साैंदर्याला बाधा पाेहचवणारी डुकरे अाता पालिकेच्या रडारवर अाली असून महापालिकेने एका महिन्यासाठी एक लाख रुपये माेजून डुकरे पकडण्याचे कंत्राट दिले अाहे. या कंत्राटदाराने दाेन दिवसात ३५ डुकरे पकडली असून पकडलेल्या डुकरांचे लिलाव करून महापालिका उत्पन्नही मिळवणार अाहे. 
 
महापालिका क्षेत्रात डुकरांची संख्या चिंतेचा विषय बनला अाहे. झाेपडपट्टीसह शहरात अनेक भागात डुकरे मुक्तपणे फिरताना, तसेच रस्त्यालगत पाण्याच्या डबक्यात बसलेली असतात. ती बऱ्याचवेळा वाहनांना धडकतात. सध्या स्वच्छ नाशिकसाठी महापालिकेने माेहीम सुरू केली असून त्यात बाधा ठरणाऱ्या डुकरांना हटवण्याची मागणी पुढे अाली हाेती. 
 
महापालिका क्षेत्रात श्वान निर्बीजीकरणाबराेबरच गायीसह माेकाट जनावरे पकडण्याचे कंत्राट दिलेले अाहे. मात्र, यातील श्वान निर्बीजीकरणाच्या ठेक्याबाबतही अाक्षेप घेतले गेलेले अाहेत. दुसरीकडे, माेकाट जनावरांना पकडण्याच्या कंत्राटाचा फारसा उपयाेग हाेत नसल्याच्या तक्रारी असताना महापालिकेने जानेवारीपासून डुकरे पकडण्यासाठी प्रायाेगिक तत्त्वावर कंत्राट देण्यासाठी खटपट सुरू केली. मात्र, या माेहिमेला काेणी तयार हाेत नव्हते. गुजरातमधील काही महापालिकांमध्ये डुकरे पकडण्याची माेहीम यशस्वी झाली असल्यामुळे तेथील माहितीही घेण्यात अाली. 

डुकरे पकडण्यासाठी कंत्राट दिलेल्या ठेकेदाराला किमान दाेनशे डुकरे पकडणे बंधनकारक अाहे. प्रत्येक विभागात पाच दिवस डुकरे पकडण्यासाठी चार कर्मचाऱ्यांचे पथक असेल. या पथकाबराेबरच स्थानिक नगरसेवक, विभागीय अधिकारी, अाराेग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक तसेच कर्मचारीही राहणार अाहेत. 
 
प्रयाेग यशस्वी झाला तर वर्षभराचे कंत्राट 
महापालिका क्षेत्रात एकही डुक्कर दिसणार नाही, अशा पद्धतीने प्रयत्न केले जाणार अाहेत. त्यासाठी सध्या प्रायाेगिक तत्त्वावर महिनाभराचे कंत्राट दिले अाहे. हा प्रयाेग यशस्वी झाला तर वर्षभराचे सहाही विभागाचे कंत्राट दिले जाईल. 
- डाॅ. सुनील बुकाणे, अाराेग्याधिकारी 
 
लिलाव करून मिळणार उत्पन्न 
या माेहिमेत पकडलेल्या डुकरांचा लिलाव ठेकेदारामार्फत केला जाणार असून लिलावातून येणारी रक्कम महापालिकेला दिली जाणार अाहे. शहरात डुकरांची प्रचंड संख्या असल्यामुळे ही माेहीम पालिकेच्या पथ्यावर पडेल, असे दिसते. 
 
पाेलिसांचीही घेणार मदत 
शहरातीलखासकरून स्लम भागात डुकरे विक्री करून उत्पन्न कमवणारे काही घटक अाहेत. त्यांच्याकडून डुकरांची देखभालही केली जाते. मात्र, ही डुकरे माेकळ्या परिसरात साेडलेली असतात. त्यांच्या अंगावर विशिष्ट प्रकारच्या खुणा करून मालकी ठरवली जाते. डुकरे पकडण्यासाठी महापालिकेने माेहीम सुरू केल्यानंतर या घटकाकडून विराेधाची शक्यता अाहे. त्यामुळे पाेलिस कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात असल्याचे अाराेग्याधिकारी डाॅ. बुकाणे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...