आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबकराेडवरील सायकल ट्रॅकचा प्रस्ताव महापालिकेने फेटाळला, ठाेस अाराखडा मिळाला तरच फेरविचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक-त्र्यंबक रस्त्याला ग्रीन राेड करण्यापासून तर येथे सायकल ट्रॅक, वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारी मार्ग बनवण्याच्या याेजना बासनात असताना महापालिका क्षेत्रात त्र्यंबकनाका ते पालिका क्षेत्रातील पिंपळगाव बहुलापर्यंत सायकल ट्रॅक उभारण्याबाबत चाचपणी करण्याचा जिल्हा उद्याेग मित्र समितीचा प्रस्ताव बांधकाम खात्याने जवळपास फेटाळल्याचे वृत्त अाहे. या रस्त्यालगत दीड फूट जागा अाताही साेडण्यात अाली असून त्याचा सायकलस्वार उत्तम पद्धतीने उपयाेग करीत असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अयाेग्य सायकल ट्रॅकच्या प्रस्तावावर पालिकेने नकाराची मानसिकता तयार केली अाहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव असल्यामुळे उगाच अडचण नकाे म्हणून स्वतंत्र सायकल ट्रॅक म्हणजे नेमके काय, याबाबत मागणी करणाऱ्या इच्छुक संघटनांकडून प्रस्ताव अाला तर फेरबदलाची भूमिकाही ठेवली अाहे.

 

शहरात सध्या सायकलप्रेमींसाठी महत्त्वाच्या रस्त्यालगत ट्रॅक बांधण्यासाठी प्रयत्न सुरू अाहेत. गाेदावरीच्या दाेन्ही किनाऱ्यावरही सायकल ट्रॅक बनवण्याचा स्मार्ट सिटी तत्कालीन नगररचना विभागाच्या उच्चपदस्थांनी अधिकाऱ्यांनी रचला. काही ठिकाणी पार्किंगचे अारक्षण विकसित करण्यात अाले मात्र ही जागा महापालिकेला विकसित करता संबधित विकसक स्वतच्या धंद्यासाठीच वापरत असल्याचाही अाराेप बाेरस्ते यांनी केला. पार्किंग हे शहराचे फुप्फुसे असून हे भूखंड माेकळ्या करून येथे वाहनांची जागा केल्यास शहराचे अाराेग्य बिघडणार अाहे. ही बाब लक्षात घेत शिवसेना अायुक्त कृष्णा यांची मंगळवारी भेट घेवून त्यांना मागील काळात समावेशक अारक्षणाच्या माध्यमातून विकसित झालेल्या अारक्षणांची प्रत्यक्ष पाहणी करून येथील एकुणच स्थितीबाबत चाैकशी करावी, अशी मागणी करणार अाहे. समावेशक अारक्षणाच्या नावाखाली झालेल्या घाेटाळ्याची चाैकशी झाल्यानंतर दाेषींवर गुन्हे दाखल करावे यासाठी शिवसेना अाक्रमक हाेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

सत्ताधारी भाजप अाताही ‘ए. अार.’च्या प्रेमात : समावेशकअारक्षण अर्थातच अॅकमाेडशन रिझर्व्हशनच्या (ए. अार.) नावाखाली जमिनी वाचवण्याचा माेठा डाव मागील काळात खेळला गेला. अाताही त्याच मार्गाने नवीन विकास अाराखड्यातील माेक्याच्या जमिनी विकसकांसाठी खुले करण्याचा प्रयत्न मागील दरवाज्याने सुरू असून त्याच्या प्रेमात सत्ताधारी भाजपही पडल्याचा टाेला बाेरस्ते यांनी लगावला. शहराचे वाटाेळे करणारे ‘ए. अार.’ चे हे प्रेमप्रकरण शिवसेना चालू देणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.

 

भुजबळांच्या काळातील ‘ग्रीनराेड’ मातीतच
सिंहस्थकुंभमेळ्यात तीन टप्प्यात जवळपास दीडशे काेटी रुपये खर्चून पिंपळगाव बहुला ते जव्हार फाटा हा २७ कि. मी. च्या अंतराचा रस्ता तयार केला गेला. हा रस्ता ग्रीनराेड करण्याचे स्वप्न दाखवले गेले. रस्त्याच्या दुतर्फा सायकल ट्रॅक, निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी वारीमार्ग, वृक्ष लावण्याचे प्रयाेजन अंदाजपत्रकात असल्याचे दावे केले गेले. या कामासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीही पुढाकार घेतला हाेता. प्रत्यक्षात, कालांतराने सायकल ट्रॅक, वारीमार्ग कागदावरच राहिला. यासंदर्भात बांधकाम खात्याचे तत्कालीन अधिकाऱ्याांना विचारले असता केवळ प्रस्तावात ती सूचना हाेती. त्यासाठी तरतूद करून ठेवली; मात्र अावश्यक एक ते दीड काेटीचा निधी उपलब्ध झाल्यामुळे पुढे काम हाेऊ शकले नाही, असे खासगीत सांगितले. भविष्यात मात्र हे काम हाेऊ शकते. त्यासाठी रस्त्याच्या दाेन्ही बाजूला दीड ते दाेन फुटाची पांढरी पट्टीही साेडल्याकडे लक्ष वेधले.

 

बातम्या आणखी आहेत...