आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ रुपये प्रतितास दराने शहरात मुक्त सायकल पर्यटन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सुदृढ अाराेग्यासाठी त्याबराेबरच सार्वजनिक वाहतुकीला पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून गाेल्फ क्लब येथे शेअरिंग सायकल याेजना सुरू करण्यात अाली असून, प्रतितास नऊ रुपये दराने शहरात काेठेही मुक्त सायकल पर्यटन करता येणार अाहे. सायकल मिळवण्यासाठी प्रथम महापालिकेकडे नाेंदणी करावी लागणार असून, नाेंदणीनंतर दिलेल्या कार्डवर कॅशलेस पद्धतीने सायकलचा वापर करता येणार अाहे.
 
महापालिका, टीसीएसचा डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर आणि नाशिक सायकलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सायकल शेअरिंग या उपक्रमाचे उद््घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आले. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात आलेल्या प्रथम केंद्रात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. शहरातील हवा प्रदूषण कमी करणे, व्यायामासाठी सायकलचा वापर करण्याची सवय लावणे आणि इच्छित स्थळी जाण्यासाठी सायकलसारख्या पर्यावरणपूरक साधनाचा हा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 
यावेळी महापौर रंजना भानसी, नगरसेविका हेमलता पाटील, अधीक्षक अभियंता यू. बी. पवार आदी उपस्थित होते. यावेळी भानसी म्हणाल्या की, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्वतंत्र सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात अाली असून, हा प्रयाेग यशस्वी झाल्यास पेडल टीम आणि नाशिक सायकलिस्ट यांनी केलेल्या विविध सर्व्हेचा अभ्यास करून इतर भागातही अंमलबजावणी करणार अाहे. स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बोस्टन (अमेरिका) शहराच्या धर्तीवर प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. चेन्नईस्थित एसआरएम युनिव्हर्सिटीच्या अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संशोधक टीमने ही संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न केला असून, गेल्या नोव्हेंबरपासून त्यांनी या प्रकल्पाची तयारी चालविली आहे.
 
असा करा वापर
पेडलकॅम्पमधील स्वॅपिंग यंत्रात आपले सदस्यत्व असलेले स्मार्ट कार्ड स्वाइप केल्यानंतर सायकल वापरता येणार आहे. सायकलचा वापर संपल्यानंतर त्याच ठिकाणी सायकल लॉक करून ठेवता येणार आहे. केवळ १५ पैसे प्रतिमिनिट एवढ्या नाममात्र दरात सायकल वापरण्यासाठी उपलब्ध असल्याचे टीसीएसच्या डिजिटल इम्पॅक्ट एसक्यूच्या सामाजिक उपक्रमांचे प्रमुख संदीप शिंदे सांगितले. या प्रकल्पासाठी प्रत्येक सायकलमागे ४० हजार एवढा खर्च झाला असून, अधिकाधिक सुविधा पुरविणे आणि चांगली सेवा यासाठी प्रकल्पाचा विस्तार करताना प्रायोजकांची गरज लागणार आहे.
 
अन्य ठिकाणी हाेणार सायकल ट्रॅक
नाशिकसायकलिस्टने यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील कोणत्या भागात सायकल ट्रॅक उभारण्यात यावेत याचे मार्गदर्शन तसेच सायकल वापरण्यास नागरिकांना उद्युक्त करणे, उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, वापरकर्त्यांना सायकल वापरताना येणाऱ्या अडचणी सोडविणे यासाठी नाशिक सायकलिस्ट या संशोधक टीमला मदत करणार असल्याचे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांनी सांगितले. सदस्य होण्यासाठीची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठीही नाशिक सायकलिस्टकडे उपलब्ध असलेल्या स्रोतांची मदत होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...