आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागेची खासगी मालकी; अनधिकृत धार्मिक स्थळे घटणार, महापालिका करणार कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - २००९पूर्वीच्या सहाशेहून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळांपैकी पहिल्या टप्प्यात रस्त्यावरील १४८ स्थळे हटवण्यासाठी नाेव्हेंबरपासून महापालिका माेहीम राबवणार असली तरी, यात अनेक धार्मिक स्थळांवर पालिकेचे अारक्षण असले तरी, जागा ताब्यात नसल्यामुळे तूर्तास ती खासगी मालकीच्या जागेवर अाहेत. त्यामुळे ही स्थळे वगळण्याची मागणी हाेत असून कायदेशीरदृष्ट्या ही बाब याेग्य असल्यामुळे पालिकेने ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्याही कमी हाेण्याची शक्यता अाहे. 
 
उच्च न्यायालयात दाखल याचिकेत राज्यभरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याचे अादेश देण्यात अाले असून त्यासाठी २००९ नंतरची जवळपास १०६ अनाधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यात अाली अाहेत. अाता २००९ अाणि १९६० या दरम्यानची धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई सुरू झाली अाहे. नाेव्हेंबर २०१७ ही त्यासाठी अखेरची मुदत असल्यामुळे पालिका युद्धपातळीवर काम हाती घेत अाहे. दरम्यान, यात पहिल्या टप्प्यात रस्त्यावरची १४८ अनधिकृत धार्मिक स्थळे हटवली जाणार अाहेत. 
 

साधारण नाेव्हेंबरपासून कारवाई सुरू हाेणार असून तत्पूर्वी संबधितांना १५ दिवसांत स्वत:हून धार्मिक स्थळे हटवण्याबाबत नाेटीसही दिली अाहे. मात्र, नाेटीस मिळाल्यानंतर अनेक ठिकाणी विश्वस्त वा स्थानिक भक्त मंडळाने जागेबाबत अाक्षेप घेतला अाहे. १४८ पैकी अनेक धार्मिक स्थळे रस्त्यावर असली तरी, अद्याप रस्ता पालिकेचा झालेला नाही. त्याचे कारण म्हणजे, रस्त्याची जागा अद्याप खासगी मालकांच्याच नावावर अाहे. रस्त्याचे रीतसर भूसंपादन झाले नसताना खासगी मालकाला माेबदला नसताना पालिकेची जागा कशी मानणार, असा तांत्रिक सवालही करण्यात अाला अाहे. 

तूर्तास, विभागीय अधिकारीस्तरावर अशा हरकती घेतल्या जात असून त्यावर सुनावणी घेऊन धार्मिक स्थळ हटवायचे की नाही याबाबत निर्णय हाेईल, असे सूत्रांचे म्हणणे अाहे. पालिकेच्या पुढील कारवाईकडे अाता लक्ष लागले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...