आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Murder Case Mayer Brother Investigation By Police

महापौरांचे बंधू अँड. राजेंद्र वाघ यांची चौकशी; धागेदोरे पोलिसांच्या हाती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- रिक्षाचालक संघटनेचा पदाधिकारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मोहन चांगले आणि त्याचा साथीदार दीपक सोनवणे यांच्या खून प्रकरणातील संशयित फरारच आहेत. दोन दिवस उलटूनही संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. महापौरांचे बंधू अँड. राजेंद्र वाघ यांची अजूनही चौकशी सुरू असून, महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला रिक्षाचालक संघटनेचा पदाधिकारी मोहन चांगले आणि त्याचा साथीदार दीपक सोनवणे यांची गंगापूररोडवरील विसावा हॉटेलसमोर हत्या करण्यात आली होती. मृताच्या नातेवाइकांनी महापौरांचे बंधू अँड. राजेंद्र वाघ यांच्यासह कुख्यात गुन्हेगार अर्जुन पगारे, गिरीश शेट्टी, व्यंकटेश मोरे, राकेश कोष्टी यांच्यावर संशय व्यक्त केला होता.

या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी अँड. राजेंद्र वाघ यांना चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. इतर संशयित फरार असून, त्यांच्या मागावर मुंबई, पुणे, गुजरात आणि जिल्ह्यातील नातेवाइकांच्या घरी तपास पथक पाठवण्यात आले आहे. अद्याप हे संशयित पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दरम्यान, अँड. राजेंद्र वाघ यांची अधिक चौकशी केली असता, खुनासंदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. संशयितांचे मोबाइल ट्रॅक करण्यात येत आहेत. गंगापूर पोलिसांसह गुन्हे शाखेचे तीन युनिटदेखील स्वतंत्र तपास करीत आहेत.