आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Nagar\'s Dam Through Pipeline Into Jayakawadi

नाशिक पेलेटाॅनसाठी राज्यभरातून ५० संघ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशभरातील सायकलपटूंच्या अाकर्षणाचे केंद्र अाणि नाशिकचे वैशिष्ट्य ठरू लागलेली ‘नाशिक पेलेटाॅन’ स्पर्धा यंदा अाणि १० जानेवारीला रंगणार असून, या स्पर्धेसाठीच्या १५० किलाेमीटर गटासाठी ५०हून अधिक संघांचा सहभाग निश्चित झाला अाहे. तीन जणांच्या या टीमची संख्या ८०हून अधिक पाेहाेचण्याची चिन्हे असून, वैयक्तिक ५० किलाेमीटरच्या गटात ३००हून अधिक प्रवेश हाेण्याची शक्यता अाहे.

यंदाच्या वर्षापासून नाशिक पेलेटाॅन स्पर्धा दाेन दिवसांमध्ये खेळविण्यात येणार अाहे. त्यात जानेवारीला १५० किलाेमीटर अंतराची, तर १० जानेवारीला ५० किलाेमीटर अाणि १५ किलाेमीटर अंतराची स्पर्धा रंगणार अाहे. गतवर्षी १५० किलाेमीटरच्या स्पर्धेत ४० संघ हाेते, यंदा ते ८०हून अधिक तर ५० किलाेमीटरच्या स्पर्धेसाठी यंदा ५०० हून अधिक स्पर्धक सहभागी हाेण्याची शक्यता अाहे. तसेच यंदाच्या वर्षापासून या स्पर्धेत प्रथमच ‘कसारा घाटाचा राजा’ पुरस्कारही दिला जाणार अाहे. तसेच पुरस्कार वितरण साेहळ्याला यंदा प्रख्यात अभिनेते सुनील शेट्टी यांची उपस्थितीदेखील लाभणार असून, पुरस्कार वितरण साेहळा १० जानेवारीला ठक्कर डाेममध्ये सायंकाळी वाजता रंगणार अाहे.

या स्पर्धेसाठी अागामी काळात वाढीव गटांमुळे अधिक रंगत
१५० किलाेमीटरच्या स्पर्धेत गतवर्षीप्रमाणे ४० वर्षांखालील, ४० वर्षांवरील असे दाेन गट असतील. त्याचबराेबर यंदा या स्पर्धेसाठी तिसरा नवीन गट निर्माण करण्यात अाला असून, त्या गटात पाेलिस, मिलिटरी, नेव्ही, अार्मी अशा युनिफाॅर्म सर्व्हिसेसचा स्वतंत्र गट तयार करण्यात अाला अाहे. तर, ५० किलाेमीटरच्या स्पर्धेतही दाेन नवीन गटांची वाढ करून त्यांची संख्या चार करण्यात अाली अाहे. त्यात १८ ते ४० पुरुष अाणि महिला, तसेच ४० वर्षांवरील पुरुष अाणि महिला असे अन्य दाेन गट नव्याने राहणार अाहेत. त्याशिवाय १५ किलाेमीटर अंतरासाठीचा एक गट पुरुष अाणि महिला एकत्र असा ठेवला जाणार अाहे. तसेच १५ किलाेमीटरची एक जाॅय राईड ठेवली जाणार असून, नावनाेंदणीचा अाज अखेरचा दिवस असल्याने अधिकाधिक सायकलप्रेमींनी सहभागी हाेण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.