आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार अपघातात तरुणी ठार, चालक गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महामार्गावर वेगात जाणारी कार दुभाजकावर धडकल्याने झालेल्या अपघातात एक तरुणी जागीच ठार झाली, तर चालक गंभीर जखमी झाला. रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास लाइफकेअर हॉस्पिटलसमोर हा अपघात झाला. अंबड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिक येथील व्यावसायिक कैलास शहा (वय 30, रा. कुलकर्णी गार्डन) व त्यांच्या दुकानातील कर्मचारी रूपाली गजानन नवले (वय 28 रा. काजीपुरा, जुने नाशिक) हे इंडीगो कारने ( एमएच 15 बीएक्स 7962) पाथर्डी फाट्याहून नाशिककडे वेगात येत असताना नासर्डी पुलावरील लाइफकेअर हॉस्पिटलसमोर चालक शहा यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली व कार चार वेळा उलटली. रूपाली कारबाहेर फेकली जाऊन दुभाजकावर आदळल्याने तिच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर शहा गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.

रूपालीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाइकांनी शवविच्छेदन न करण्याचा पवित्रा घेतला. यामुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नातलगांची समजूत काढल्यानंतर हा तणाव निवळला.