आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: नाट्यपरिषद निवडणुकीचा गोंधळ आवरता आवरेना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मतपत्रिका पोस्टाच्या हवाली करून नाट्यपरिषदेने व मतदारांनी आपले पत्ते अपडेट न केल्याचे कारण देत मतपत्रिकांच्या गोंधळाबाबत निवडणूक अधिकार्‍यांनी हात वर केले. त्यामुळे नाशकातील अनेक मतदारांची अडचण झाली आहे.

तब्बल नऊ वर्षांनी ही निवडणूक होत असल्याने प्रत्येकाला मतदान करण्याबाबत उत्सुकता आहे. पण, निवडणूक आठवड्यावर येऊन ठेपली तरी मतपत्रिका न मिळाल्याने मतदारांमध्ये असंतोष आहे. एकीकडे डुप्लिकेट मतपत्रिकांचे पेव फुटलेले असताना, दुसरीकडे मतपत्रिकाच न मिळाल्याची तक्रार वाढत आहे. मतमोजणी 17 फेब्रुवारीला सायंकाळी 8.30 नंतर सुरू होईल. त्यामुळे मतदार चिंतेत आहेत.