आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Neharu Nagar Government Quarters Safety Issue

नेहरूनगरातील रहिवाशांची संख्या घटल्याने सरकारी मालमत्तेची लूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - महापालिकेच्या हद्दीतील नाशिकरोड शहर परिसरात शेती क्षेत्राबरोबरच इंडिया सिक्युरिटी, करन्सी नोट प्रेस, गांधीनगर मुद्राणालय, मध्यवर्ती कारागृह, मध्य रेल्वे, एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्र, ट्रॅक्शन मशीन कारखाना, डिस्टिलरी क्वार्टर आदी शासकीय संस्थांमधील कामगारांसाठी नेहरूनगर, गोरेवाडी, कारागृह परिसर, गांधीनगर तसेच स्टेशनवाडी एकलहरे येथे कामगार वसाहती निर्माण करण्यात आल्या आहे.
आजमितीस या वसाहतीची दुरवस्था झाली असून, रिकामे क्वार्टर अवैध धंद्याचे अड्डे बनले आहे. वसाहतीतील रहिवाशांची संख्या घटल्याने चाेरट्यांकडून सरकारी संपत्तीची लूट सुरू आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने पासपोर्ट छपाईसाठी अनुकूल वातावरणामुळे सन १९२४ मध्ये इंडिया सिक्युरिटी सन चलन छपाईसाठी पोषक वातावरणामुळे सन १९२८ मध्ये करन्सी नोट प्रेसची स्थापना केली. कामगारांसाठी गोरेवाडी नेहरूनगर येथे सुमारे १९८५ मध्ये कामगारांसाठी वसाहत उभारण्यात आली. सुरुवातीच्या काळात दोन्ही प्रेसचे सुमारे २० हजार कामगार होते.
कामगार गोरेवाडी येथील दहाचाळ नेहरूनगर येथे स्थायिक झाले. सर्वधर्मिय एका ठिकाणी राहत असल्याने परिरसराला गावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शाळा, दवाखाना, भाजीबाजार, क्रीडांगण, वेल्फेअर हॉल आदी सुविधांमुळे वसाहत गजबजलेली असायची. इंडिया सिक्युरिटी, करन्सी नोट प्रेसचे महामंडळात रूपांतर झाल्यानंतर कामगारांची संख्या घटली. आज दोन्ही प्रेस मिळून अवघे सहा हजार कामगार असल्याने दोन्ही वसाहतीतील रहिवासी कामगारांची संख्या घटली.
दरम्यानच्या काळात प्रेसच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपवण्यात आल्यानंतर सुरक्षा जवानांना राहण्यासाठी येथे जागा दिली. सन २००५ नंतर गजबजलेली वसाहत आज रिकामी झाली आहे. मोजकेच कामगारांचे कुटुंबाचे येथे वास्तव्य नेहरूनगरला आहे. गोरेवाडी येथील कामगार वसाहत काही वर्षापूर्वीच जमीनदोस्त झाली.

संशयितांचा वावर वाढला, सुरक्षा धोक्यात
वसाहतरिकामी झाल्याने इमारतींना तडे गेले आहे. संरक्षण भिंतीला भगदाड पडले आहे. सायकल स्टॅण्डचे दरवाजे, तसेच घरांचे कडीकोयंडे, नळ, प्लॅस्टिक, लोखंडी पाइप, खिडक्यांची तावदाने, विद्युत साहित्यांची भुरट्या चोरट्यांनी लूट केली आहे.
रिकामे क्वार्टर एक खंडहर झाले आहे. इमारतींवर जंगली वेल, वनस्पती वाढल्या आहे. रिकाम्या क्वार्टरचा उपयोग अवैध धंद्यासाठी होत असून, गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. वसाहतीच्या पाच प्रवेशव्दारावर सुरक्षा नसल्याने अनेक संशयितांचा वावर वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.