आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक- कॅन्सर रुग्ण, अपंगांना आधार देणारी ‘किट्टी पार्टी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक- महफिलेइश्क को... अापकी माैजुदगी से सजाना है माेहब्बत का जसबा दिलो मे हो ताे फिर, कदमाे मे ये जमाना है असे एका शायरने म्हटले अाहे, ते खरंच अाहे अाणि याचा प्रत्यय येताे ताे शहरातील मारवाडी युवा मंच मिडटाऊनच्या शाखेने सलग दुसऱ्यावर्षी अायाेजित केलेल्या अनाेख्या ‘किट्टी पार्टीतून’. 
 
प्रेमाचा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जाणारा ‘व्हॅलेंटाइन डे’अगदी अागळ्यावेगळ्या पद्धतीने मिडटाऊन कडून साजरा केला जाताे. यंदा १० फेब्रुवारीला अशाच एका विशेष किट्टी पार्टीचे अायाेजन केले असून, यात शहरातील महिलांना सहभागाकरिता अावाहन करण्यात अाले अाहे. या पार्टीच्या उपक्रमातून संकलित हाेणारा निधी गरजूंना कॅन्सर उपचार अाणि कृत्रिम अवयव प्रत्याराेपणाकरिता खर्च केला जाणार अाहे. 
 
मारवाडी समाजाच्या महिला जास्त करून घरातच असतात, त्यांना एकत्र अाणणं अाणि यानिमित्ताने काही क्षणाचा विरंगुळा मनाेरंजन व्हावं तसेच यातूनच समाजसेवेलाही अार्थिक हातभार लागावा या उद्देशाने मागील वर्षापासून अशा किट्टी पार्टीचे अायाेजन केले जाऊ लागले अाहे. 

गतवर्षी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यंदाही असाच अनाेखा उपक्रम अायाेजित करण्यात अाला असल्याची माहिती संस्थेच्या सचिव शिल्पा राका यांनी दिली. 
 
मारवाडी युवा मंचने काही दिवसांपूर्वीच शहरात कॅन्सर तपासणीचे खुले शिबिर घेतले, ज्यात तीनशेवर महिला-पुरुषांची नि:शुल्क तपासणी केली गेली, त्यापैकी दाेन रुग्णांना कॅन्सर तर एका बालकाला थॅलेसेमिया अाढळून अाला. 
 
कॅन्सरच्या रुग्णांवर पुढील उपचाराकरिता मंचकडून अार्थिक मदत केली जाणार अाहे. त्याचबराेबर मंचचे राष्ट्रीय अभियान असलेल्या कृत्रिम अवयव प्रत्याराेपणाच्या उपक्रमाकरिता नाशिकमध्येच असलेल्या कृत्रिम अवयव निर्मिती कारखान्यालाही असाच हातभार या पार्टीतून अालेल्या अार्थिक उत्पन्न लावणार अाहे. मिडटाऊनच्या अध्यक्षा स्मिता बाेरा, सुरुची पाेद्दार, सीमा सिंघानिया या उपक्रमाकरिता विशेष परिश्रम घेत अाहेत. 
 
ही किट्टी पार्टी पाल्म सेल्स येथे दुपारी १२ ते या वेळेत होईल. ती सर्व महिलांसाठी खुली असून, याकरिता प्रतिव्यक्ती ८५० रुपये अार्थिक सहयाेग द्यावा लागणार अाहे. किट्टी ग्रुपही यात सहभागी हाेऊ शकतात. याकरिता नाव नाेंदणीसाठी शिल्पा राका, माे. नं. ९३७३९०००८२, प्रभा माे. नं. ९४२०७४७७१४ येथे काॅल करता येऊ शकेल.
बातम्या आणखी आहेत...