आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषभदेवांच्या मूर्तीची प्रेरणा हस्तिनापुरातून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मांगीतुंगी (जि. नाशिक) - मांगीतुंगीच्या डोंगरात घडवण्यात येणाऱ्या भगवान ऋषभदेवांच्या मूर्तीची प्रेरणा जैनधर्मीयांच्या मार्गदर्शक व पूज्यनीय ज्ञानमतीमाता यांच्या संकल्पनेतून साकारली. माताजी चातुर्मासासाठी हस्तिनापूरहून पायी मांगीतुंगी येथे येतात. जैन ग्रंथांमध्ये मोक्षप्राप्तीसाठी या स्थानाचे अनन्यसाधारण महत्त्व वर्णिलेले आहे. त्यामुळे ही मूर्ती घडवण्याचे ठरले.

मूर्तीचा लोकार्पण सोहळा फेब्रुवारी २०१६ मध्ये होणार आहे. त्यासाठी ११० एकर जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. सपाटीकरण करून या ठिकाणी दीड लाख चौरस फुटांचा मंडप उभारण्यात येणार आहे. रोज ५ हजार भाविक पूजेला बसू शकतील. सुमारे एक लाख लोक मंडपात सामावू शकतील. जवळपास दोन महिने हा कार्यक्रम चालेल. या हिशेबाने २५ लाख भाविक येथे येतील. त्यासाठी ५ हजार तात्पुरती निवासस्थाने व भोजनालये उभारण्यात येत आहेत.

मांगीतुंगीला कसे जाल : {मुंबईहून व्हाया नाशिक ३०० कि.मी.वर {अाैरंगाबाद, सुरतपासून २०० कि.मी.वर { मनमाड, नाशिकहून १०० कि.मी.वर {नाशिक-धुळे मार्गावर साेग्रस फाट्यावरून डावीकडे विंचूर ते शहादा-प्रकाशा राज्यमार्गावर ताहराबादहून ८ कि.मी.वर मांगीतुंगी.
बातम्या आणखी आहेत...