आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Action Against One Hundred Vehicle

शंभर वाहनांवर कारवाई,शाळांच्या वेळात वाहनांना प्रवेशास बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सिडकोतील त्रिमूर्ती चौकात वाहनाच्या धडकेने दोघांचा अपघाती बळी गेल्याच्या घटनेनंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली असून, सोमवारी सकाळपासूनच अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सोमवारी दिवसभरात शंभरहून अधिक वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई दोन-चार दिवसांपुरता फार्स न ठरता कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. दरम्यान, या भागातील अतिक्रमणांची वाढती समस्या कायम असून, ती दूर करण्यास महापालिकेला मुहूर्त सापडेल की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


शनिवारी झालेल्या अपघाताच्या अपघातानंतर रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होऊन येथील अतिक्रमण, वाहतूक कोंडी, ग्राहकांची रस्त्यावरील वाहने व अवजड वाहनांवर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यात नगरसेवक तानाजी जायभावे, अनिल मटाले यांनीही पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत वाहतुकीला शिस्त लावण्याची सूचना केली होती. या घटनेनंतर सोमवारी सकाळी वाहतूक पोलिसांकडून अवजड वाहनांविरोधात कारवाई सुरू झाली. सकाळी शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांची गर्दी होत असतानाच डंपर, ट्रक, टेम्पो वेगाने जात असल्याचे निदर्शनास आले. अशा वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले. अवजड वाहनधारकांना शाळेच्या वेळात बंदी घालण्यात आली आहे. ट्रक, टेम्पो या वाहनधारकांनी पाथर्डी फाटा अथवा अंबड औद्योगिक वसाहतीतून त्रिमूर्ती चौकात न येता बाहेरच्या मार्गाने महामार्गावरूनच वाहने हाकावी, असे आदेश वाहतूक पोलिसांनी दिले आहेत.


अतिक्रमणही हटवावे
सोमवारी दिवसभरात चार वाहतूक पोलिसांकडून वाळू, विटा, माती, सिमेंटची वाहतूक करणार्‍या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येत असली, तरी ही कारवाई दोन-तीन दिवसांपुरती र्मयादित न राहता कायमस्वरूपी सुरू ठेवावी. तसेच, या भागातील हॉटेल्स, स्वीट मार्ट, खाद्य पदार्थांच्या गाड्या व इतर दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात यावे. - शेखर कुलकर्णी, रहिवासी