आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - अरब अमिरातमधील कुवेत येथे सुरू असलेल्या आशियाई एअरगन चॅम्पियनशिपच्या ज्युनिअर महिला गटात नाशिकची उगवती नेमबाज श्रेया गावंडे हिने वैयक्तिक कांस्य, तर सांघिक गटात रौप्यपदक पटकावले. तर, नाशिकचाच नेमबाज प्रतीक बोरसे याने ज्युनिअरच्या सांघिक गटात रौप्यपदक पटकावत देशाच्या पदकतालिकेत मोलाची भर घातली.
श्रेयाने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 376 गुण नोंदविले. अवघ्या अध्र्या गुणाच्या फरकाने तिचे वैयक्तिकमधील रौप्यपदक हुकले. श्रेयाचे नेमबाजीचे प्राथमिक धडे मोनाली गोर्हे यांच्याकडे तसेच नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीत झाले असून, ती फ्रावशी अकॅडमीची विद्यार्थिनी आहे. प्रतीकने 10 मीटर एअररायफल प्रकारात यश मिळविले. वैयक्तिक गटात सहावा आल्याने त्याचे या गटातील पदक थोडक्यात हुकले. नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीचा तो नेमबाज असून, प्रशिक्षक नानासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो. भोंसलामध्ये तो अकरावीला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.