आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्बसदृश वस्तूचा शेतात जाळ,स्फोटाच्या अफवेने पळापळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/ इगतपुरी - शेणीत (ता. इगतपुरी) येथे रविवारी दुपारच्या सुमारास शेताची नांगरणी सुरू असताना शेतात बॉम्बसदृश वस्तूचा जाळ झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. स्फोटाच्या भीतीने नागरिकांची पळापळ झाली. स्फोटाची अफवा वार्‍यासारखी संपूर्ण तालुक्यात पसरली. अखेर नाशिक व मालेगाव येथून पोलिसांनी मागविलेल्या बॉम्बशोधक पथकाने हे स्फोटक निकामी केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेणीत (ता. इगतपुरी) येथील संदीप तुकाराम कुंडारिया यांची शेणीत फाटा येथे गट नंबर 256 मध्ये शेतजमीन आहे. ही जमीन अनेक वर्षांपासून पडीक आहे. रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास संदीप कुंडारिया हे ट्रॅक्टरने जमीन नांगरत असताना नांगराला लोखंडी वस्तू लागली. ही वस्तू वर आल्याने त्यामधून धूर निघू लागला. कुंडारिया यांनी कुतूहलाने जवळ जाऊन ही वस्तू पाहिली असता, या वस्तूने अचानक पेट घेतला. त्यांनी पळ काढला व ग्रामस्थांना माहिती दिली. नागरिकांनी वाडीवर्‍हे पोलिसांना ही घटना कळवली. सहायक निरीक्षक बी. ए. बढे, उपनिरीक्षक एन. ए. सय्यद आणि कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नाशिक बॉम्बशोध पथकास कळविल्यानंतर काही वेळात हे पथक तेथे दाखल झाले. पथकाने अर्धा तासात हा बॉम्ब निकामी केला. या प्रकरणी वाडीवर्‍हे पोलिसांत नोंद करण्यात आली असून, बॉम्बचे तुकडे ताब्यात घेण्यात आले आहेत.

पुढे वाचा...