आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Dengerous Chemical, Divya Marathi

कार्बाईडनंतर घातक रसायनांचा वापर सुरू, अन्न व औषध प्रशासनाचे जुन्या व्यापार्‍यांकडे दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इथिनील या घातक रसायनाचा वापर करून फळे पिकविण्याचा कारभार शहरात जोरदार सुरू आहे. इथिनीलच्या अशा वापरातून नागरिकांच्या आरोग्याशी अप्रत्यक्ष जीवघेणा खेळ सुरू असतानाही, अन्न आणि औषध प्रशासन विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे. हे रसायन कार्बाईडपेक्षाही अधिक घातक असल्याने, त्याचा बेसुमार वापर करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आंब्यांचा हंगाम अजून सुरू झाला नसला, तरी बाजारात पिकलेले आंबे दाखल झाले आहेत. काही व्यापार्‍यांकडे सर्व प्रकारचे पिवळेधमक आंबे विक्री केले जात आहेत. हे आंबे पिकविण्याची सर्व प्रक्रिया लक्षात घेता इथिनीलच्या माध्यमातून कैरी दोन दिवसांत पिकवली जाते. त्यासाठी गॅस चेंबरचा वापर केला जातो. त्यामुळे सध्या केळी, टरबूज आदी फळेदेखील पिकविण्याची प्रक्रिया जोमात सुरू आहे. तर, महिनाभरापासून काही व्यापारी याच पद्धतीने आंबा विक्री करत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाला ही सर्व माहिती असूनदेखील काही जुन्या व्यापार्‍यांविरुद्ध कारवाई केली जात नसल्याने अन्न व औषध प्रशसन विभागाचे अधिकारी संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.
गॅस चेंबरमध्ये तपासणी नाही
अन्न आणि औषध विभागाकडून शहरातील सात ते आठ व्यावसायिकांना फळे पिकविण्यासाठी लागणार्‍या चेंबरचा परवाना देण्यात आला आहे. यातील बहुतांश व्यापारी क्षमतेपेक्षा जास्त रसायनाचा वापर करून फळे पिकवितात. फळमार्केटमध्येही याच पद्धतीचा वापर केला जात असून, ग्राहकांना मात्र गॅसच्या माध्यमातून आंबे पिकविले असल्याचे सांगून फसविले जात आहे.
या फळांवर अधिक प्रभाव
कच्चे आंबे आणि केळी या इथिनील मिश्रित पाण्यात बुडवून ते सुकविण्यासाठी आढी केली जाते. रसायनाच्या अधिक प्रमाणामुळे हिरवी फळे एका रात्रीत पिवळी दिसू लागतात. हीच फळे बाजारपेठेत जातात.
कृषी विभागाचा जीआर
इथिनीलद्वारे फळ पिकविण्याची परवानगी कृषी विभागाकडून देण्यात आली असल्याचे विभागाकडून सूचित करण्यात आले आहे. या नियमास अधीन राहून किती व्यापारी फळे पिकवितात, यावर मात्र विभागाचा अंकुश नसल्याचे निदश्रनास येत आहे.
गॅसमध्ये वापर करणे गुन्हा
गॅसमध्ये कार्बाईडचा वापर करणे हा गंभीर गुन्हा आहे. तसेच, इथिनीलद्वारे फळे पिकविताना त्याचा किती वापर करावा, याची क्षमता ठरलेली आहे. प्रमाणापेक्षा अधिक इथिनीलचा वापर करणार्‍या व्यापार्‍यांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल. त्यासाठी स्वतंत्र मोहीम राबविणार आहे. चंद्रकांत पवार, आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग
अशी केली जाते प्रक्रिया
मागणी व पुरवठा यांचा मेळ घालताना स्वत:च्या स्वार्थासाठी काही व्यापारी फळे पिकविण्यासाठी इथिनील रसायनाचा क्षमतेपेक्षा अधिक वापर करण्यात येतो. त्यासाठी एका पिंपामध्ये हे रसायन पाण्यात मिसळून त्यामध्ये आंबे, केळी, टरबूज, खरबूज, सफरचंद अशी विविध फळे मिसळून ते दोन दिवस सुखवले जातात. या प्रक्रियेमुळे कच्ची फळे
अवघ्या दोन दिवसांत पिकतात.
अशी आहे वापराची मर्यादा
इथिनील पाण्यात मिसळविण्याचे प्रमाण 2 टक्के आहे. 200 पीपीएमपर्यंत चेंबरमधील गॅसमध्ये त्याचा वापर करता येतो. या प्रक्रियेद्वारे दोन ते तीन दिवसांत फळे पिकविली जातात. मात्र, या रसायनाच्या अधिक वापरामुळे फळे रात्रभरात पिकतात व त्यामुळेच याचा बेसुमार वापर होतो.