आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र टोलमुक्त करणार, देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्यात वाळू माफिया, इंधन माफिया यांच्याप्रमाणेच टोल माफिया तयार झाले आहेत. राज्यातील मंत्र्यांचे आणि टोलमाफियांचे संबंध तयार झाल्याने राज्यातील जनतेला टोलच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, देशात आणि राज्यात एनडीएचे सरकार आल्यास राज्याला टोलमुक्त करणार असून, त्यासाठी योजनाही तयार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांच्या प्रवेश सोहळ्यादरम्यान केले.


भारतीय जनता पक्षाच्या वतीने प.सा. नाट्यगृहात सोमवारी शहरातील सहाही मंडलातील शेकडो तरुण, उद्योजक, वकील, व्यापार्‍यांचा प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, उपमहापौर सतीश कुलक र्णी, लक्ष्मण सावजी, नगरसेविका सीमा हिरे, देवयानी फरांदे, सविता दलवानी, विजय साने, बाळासाहेब सानप, सुरेश पाटील, सुनील केदार, गोपाळ पाटील, बिपीन बुझरुक, परशराम वाघेरे, कुणाल वाघ, संभाजी मोरुस्कर उपस्थित होते.


बाळासाहेबांची आठवण आणि भुजबळांची नक्कल
शिवसेनाप्रमुखांनी मोफत वीज देण्याची घोषणा केल्यानंतर आघाडी सरकारने लगेच शून्य रुपयांचे बिल पाठविले. त्यामुळे टोलमुक्तीसाठी असलेल्या योजना उघड करणार नसल्याचे सांगून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली, तर छगन भुजबळ यांच्या आवाजात ‘राज्यात 35 हजार कोटींचे रस्ते तयार केले असून, त्यासाठी टोल घेण्यात येतो’, अशी नक्कल केली.

‘राज्यपाल हटावचा नारा’
विविध घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी राज्यात 16 आजी-माजी मंत्र्यांवर खटला चालविण्यासाठी मंत्रिमंडळ आणि राज्यपाल परवानगी देत नाहीत. त्यामुळे ‘राज्यपाल हटाव’चा नारा देण्यात आला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. खासगी गुंतवणुकीतूनच राज्याला विकासाच्या दिशेने नेणार असून, त्याचा भार जनतेवर येऊ दिला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आघाडी सरकारने केली तरुणांची निराशा
कोणताच निर्णय न घेणारे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व त्यांच्या सरकारने देशात 52 कोटी कुशल रोजगार निर्माण करण्याचे आमिष दाखविले होते. मात्र, त्यांना केवळ 5 कोटीही कुशल मनुष्यबळ तयार करता आले नाही, तर अटलबिहारी पंतप्रधान असताना त्यांनी 6 कोटी 70 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला होता.