आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरलेले दोन हजार डॉलर इराणी पर्यटकाला परत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी - इगतपुरीयेथे विपश्यनेसाठी इराणमधून आलेल्या पर्यटकाचे २० ऑगस्ट रोजी चोरीस गेलेले दोन हजार डॉलर (१ लाख १६ हजार रुपये भारतीय चलनात) परत मिळविण्यात इगतपुरी पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी संशयितास अटक करण्यात आली आहे. दहा िदवसांचे िवपश्यना िशबिर पूर्ण झाल्यानंतर साेमवारी (दि. १) या िवदेशी पाहुण्यांना पाेलिस ठाण्यात बाेलावून त्यांना दाेन हजार डाॅलर परत करण्यात अाले. या प्रसंगी या पाहुण्यांचे डाेळे पाणावले. इराणमधूनमाेहम्मद अामिन नेघाबद (वय ३६) अाणि त्याची सहकारी महिला ताहेरा नाेराेझी (३६) या दाेघांचे िवमानाने मुंबईतील सहारा अांतरराष्ट्रीय िवमानतळावर २० अाॅगस्ट राेजी अागमन झाले.
इगतपुरीतील िवश्व िवपश्यना केंद्रात िवपश्यना साधना करण्यासाठी ते अाले होते. मुंबईहून इगतपुरीकडे जाण्यासाठी त्यांनी िवमानतळाबाहेरील जेएमडी ट्रॅव्हल्स कंपनीकडून इनाेव्हा कार (एमएच ०३ बीसी ४१८) भाडेतत्त्वावर घेतली. या कारने ते िवपश्यना केंद्राच्या प्रवेशद्वारावर पाेहोचले चाैकशी करण्यासाठी ते केंद्रात गेले असता या संधीचा फायदा उठवत वाहनचालक सदाशिव गाेविंद नवसुपे (४७, रा. धारावी, मुंबई) याने वाहनातील सामानातून या िवदेशी नागरिकांचे दाेन हजार डाॅलर लंपास केलेे. दरम्यान, केंद्रात पाेहोचल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात अाली. ताेपर्यंत वाहनचालक फरार झाला होता. ही घटना िवपश्यना केंद्राचे धम्मलाेक गाेविंद वाणी यांच्या िनदर्शनास अाल्यानंतर त्यांनी इगतपुरी पाेलिस ठाण्याचे िनरीक्षक संदीप काेळेकर यांना कळवली. त्यानंतर पाेलिसांनी िफर्याद नाेंदवत मुंबईतील ट्रॅव्हल्स कंपनीचा शाेध घेऊन संबंिधत वाहनचालकाचा पत्ता मिळविला त्यास धारावी येथून ताब्यात घेतले. पाेलिसी खाक्या दाखविल्यानंतर वाहनचालकाने चाेरीची कबुली िदली दाेन हजार डाॅलर पाेलिसांनी त्याच्याकडून ताब्यात घेतले. पाेलिस अधीक्षक संजय माेहिते, उपविभागीय पाेलिस अधिकारी सी. एस. देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली िनरीक्षक काेळेकर, पाेलिस नाईक रामदास गांगुर्डे, कैलास जाधव, सलमान इनामदार, अशाेक खंडरे यांनी केलेला तपास काैतुकास्पद असल्याचे धम्मसेवक गाेविंद वाणी यांनी सांिगतले.

२४तासांत गुन्हा उघडकीस
२०अाॅगस्ट राेजी चाेरी झाल्यानंतर २४ तासांत चाेराला जेरबंद करण्यात इगतपुरी पाेलिसांना यश अाले. मात्र, िवपश्यना िशबिरात व्यत्यय येऊ नये यासाठी पाेलिसांनी त्यांना िशबिर संपल्यानंतर हे पैसे त्यांच्याकडे सुपूर्द केले.

िवदेशीपर्यटकांची काळजी घेणे हे कर्तव्यच
िवदेशीपर्यटकांची काळजी घेणे हे अामचे कर्तव्यच अाहे. त्यानुसार चाेरी करणाऱ्या अाराेपीला शाेधून काढले याबाबत अाम्ही समाधानी अाहोत. संदीप काेळेकर, िनरीक्षक, इगतपुरी पाेलिस ठाणे

पाेलिसांचेअाभार
पाेलिसांनीवेगाने तपास करत अामचे चाेरी गेलेले पैसे परत मिळवून िदले याबाबत अाम्ही त्यांचे मनापासून अाभार मानताे. तसेच विपश्यना केंद्र न्याययंत्रणेनेही केलेले सहकार्य काैतुकास्पद अाहे. माेहमद अमिन नेघाबद, पर्यटक ,इराण