नाशिक - पुढील महिन्यात ऐन मतमोजणी आणि दिवाळीच्या काळात घेण्यात येणारी स्टाफ सिलेक्शनची परीक्षा पुढे ढकला, असे पत्र जिल्हा प्रशासनाने मुंबई येथील स्टाफ सिलेक्शन कमिशनला दिले आहे. त्यामुळे परीक्षेच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता वाढली आहे.
स्टाफ सिलेक्शनची विविध पदासांठीची परीक्षा १९ आणि २६ ऑक्टोबरला होणार आहे. मात्र, नेमक्या या दोन्ही दिवशी प्रशासकीय अडचणी आल्या आहेत. १९ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अाहे, तर २६ ऑक्टोबरला दिवाळीच्या सुट्या आहेत. त्यामुळे ऐन धावपळ आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता पाहता या परीक्षांच्या तारखा बदलव्यात,अशी विनंती जिल्हा प्रशासनाने कमिशनला केली आहे.