आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Duranto Express, Divya Marathi

दुरांतो एक्स्प्रेस रोखून पंचवटीस हिरवा कंदील,प्रथमच आक्रमक प्रवाशांपुढे झुकले रेल्वे प्रशासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - पंचवटी एक्स्प्रेसला रोखून दुरांतोला वाट मोकळी करून देण्याच्या वाढत्या प्रकाराला कंटाळलेल्या प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर रेल्वे प्रशासनाने शनिवारी दुरांतोलाच रोखून ‘पंचवटी’ला वाट मोकळी करून दिली. गेल्या अनेक वर्षांत दुरांतोऐवजी पंचवटीला हिरवा कंदील दाखवण्याची ही पहिलीच घटना आहे.
शहर-जिल्ह्यातून मुंबईला नोकरी-व्यवसायासाठी नियमित जाणार्‍या प्रवाशांसाठी पंचवटी एक्स्प्रेस महत्त्वपूर्ण असताना परराज्यातून येणार्‍या दुरांतोसाठी मनमाड ते कसारा स्थानकापर्यंत पंचवटी कुठेही ‘साइड ट्रॅक’ केली जाते. त्यामुळे प्रवाशांना मुंबईला पोहोचण्यास उशीर होतो. गेल्या काही महिन्यांपासून पंचवटी बाजूला उभी करण्याचे प्रमाण वाढल्याने अखेर शनिवारी प्रवाशांनी प्रशासनाला दुरांतोला ‘साइड ट्रॅक’ करण्यास भाग पाडले.
पंचवटी एक्सप्रेसला जाताना व येताना दररोज होणार्‍या उशिरामुळे वैतागलेल्या प्रवाशांनी गुरुवारी नाशिकरोड स्थानकावर रीतसर तक्रार नोंदवली होती. त्यानंतर एकच दिवस वेळेत धावलेली पंचवटी शनिवारी दुरांतोसाठी देवळाली कॅम्पला ‘साइड ट्रॅक’ करण्यात आली. प्रवाशांनी तत्काळ देवळाली कॅम्पच्या स्टेशन अधीक्षकांना घेराव घातला. संतप्त प्रवाशांची भावना जाणून अधीक्षकांनी भुसावळ कंट्रोल रूमशी चर्चा करून पंचवटीला हिरवा कंदील दाखवला व दुरांतो रोखून धरली. दुरांतो रोखण्याची हिंमत प्रथमच दाखवल्याने प्रवाशांनी स्टेशन अधीक्षकांचे कौतुक केले.