आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Gangapur Dam, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंगा‘पूर’च्या विसर्गाने गोदाकाठी तारांबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवार सकाळी वाजेपर्यंत ९४ मिलीमीटर, काश्यपी क्षेत्रात २४ मि.मी. पाऊस पडला. त्र्यंबकेश्वरला ११० मिलीमीटर पाऊस पडल्याने गंगापूर धरणात हजार ३८६ दशलक्ष घनफूट (९५ टक्के) पाणीसाठा झाला. सोमवारी दुपारी गंगापूरमधून हजार ११६ क्यूसेकचा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरीला पूर आल्याने दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाण्याची पातळी होती.

जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी िनफाड, येवला, चांदवड, देवळा, इगतपुरी, सिन्नर, नांदगाव, मालेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर, दारणा, कडवासह इतर धरणातून विसर्ग सुरू आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून पंधरा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्गाचा लाभ जायकवाडी धरणाला होणार आहे.

त्र्यंबकलाएकाच रात्रीत ११० मि.मी.
त्र्यंबकेश्वरत्र्यंबकेश्वरयेथे रविवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर पडतच होता. एकाच रात्रीत सुमारे ११० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली. यामुळे त्र्यंबक शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. नीलपर्वतावर सध्या सुरू असलेल्या बांधकामाची माती-िचखल पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर अाला होता.

वालदेवीच्यापाणी पातळीत वाढ
नाशिकरोडमुसळधारपावसामुळे वालदेवी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली अाहे. महादेव मंदीर, स्मशानभूमीत पाणी शिरले अाहे. महापालिकेचे विभागीय अधिकारी िकशाेर चव्हाण, अाराेग्य अधीक्षक संजय दराडे यांनी पाहणी केली. अिधकाऱ्यांनी वालदेवी नदीिकनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा िदला अाहे.
गाेदावरीला पाणी साेडल्यामुळे रामसेतू पुलालगत उभी केलेली चारचाकी पाण्यात अशी अडकली.
गंगापूर धरणाच्या लाभक्षेत्रात माेठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने साेमवारी दुपारी गाेदावरीला पाणी साेडण्यात अाले. यामुळे गंगाघाटावरील भाजीबाजारात पाणी शिरले. यामुळे व्यावसायिकांची माेठी तारांबळ उडाली. (सर्वछायाचित्रे : िववेक बाेकील)
पाण्याच्या प्रवाहात रामसेतू पूल ते गाडगे महाराज पुलादरम्यान अडकलेली चारचाकी.
गंगापूर १११६
दारणा २,८५०
कडवा ४१५
भावली १३५
आळंदी २४३
वालदेवी २,१७५

रामकुंडावर जनजीवन विस्कळीत
गंगापूरधरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीला पूर आला. रामकुंड परिसरात जनजीवन विस्कळीत झाले. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी होते. दक्षता म्हणून परिसरात वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. खंडोबा मंदिर परिसरात एक चारचाकी गाडी पाण्यात अडकली होती.