आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Hailstorm, Crops Damaging, Divya Marathi

गीरपीटीमुळे 256 कोटींच्या पिकांचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गारपिटीमुळे विभागातील नुकसानीच्या आढाव्याचे काम विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. विभागातील 2534, तर जिल्ह्यातील 312 गावांत गारपिटीने नुकसान झाले आहे. विभागातील 1027 गावांत, तर जिल्ह्यातील 174 गावांत अद्यापही पंचनामे सुरू आहेत. विभागात प्राथमिक अंदाजानुसार फक्त पिकांचेच 256 कोटी 67 लाख 7 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात 29,096 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, विभागात हेच नुक सान 2,90,818 हेक्टरवर झाले आहे. विभागात आठ जणांना प्राणास मुकावे लागले असून, 38 जण जखमी झाले आहेत. 85 गुरांचा जीव गेला असून, 11,982 पशुपक्षी दगावले आहेत. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 1203 गावे प्रभावित असून, त्यापैकी 740 गावांत पंचनामे पूर्ण झाले आहेत.