आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार दिलीप वाघ यांच्यावर बलात्काराचा खटला चालणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पाचोरा (जळगाव) येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार दिलीप वाघ यांच्याविरुद्ध दाखल बलात्काराच्या गुन्ह्यातून त्यांना मुक्त करण्याचा पोलिसांनी सादर केलेला अहवाल न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे या प्रलंबित खटल्याची सुनावणी लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.


नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात वाघ व त्यांचे स्वीय सहायक महेश माळी यांच्याविरुद्ध 25 फेब्रुवारी 2011 रोजी हा गुन्हा दाखल झाला. तक्रारदार मुलीने दोघांनी नोकरीचे आमीष दाखवित शासकीय विश्रामगृहात बलात्कार केल्याचे म्हटले होते. दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर त्या मुलीने पोलिसांकडे प्रतिज्ञापत्र सादर केले.

जळगावचे शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनीच खोटी तक्रार देण्यास भाग पाडल्याचे त्यात म्हटले होते. तिचा तसा जबाब न्यायालयासमोरही नोंदवून घेण्यात आला. त्या आधारे वाघ व माळी यांना मुक्त करण्याचा अहवाल सादर केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साने यांच्यासमोर सुनावणीत पाटील यांच्या वतीने अँड. अविनाश भिडे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. पीडितेला संशयितांकडून धमकीचे फोन आल्याच्या नोंदी पोलिसांकडे आहेत. वाघ यांचा गुन्ह्यात सहभाग आहे की नाही, हे न्यायालय ठरवेल, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांचा अहवाल फेटाळला व पाटील यांच्यावरील कारवाईस नकार दिला.