आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Motocycle Thefts, Divya Marathi

दुचाकी चोरा अन् मनसोक्त फिरा..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - मोटारसायकल चोरायची, मनसोक्त दामटायची आणि पेट्रोल संपल्यावर जवळपास कोठेतरी उभी करून पलायन करायचं..अशी युक्ती वापरत यंत्रणेच्या नाकी नऊ आणणार्‍या अल्पवयीन मुलांच्या टोळीला नाशिकरोड पोलिसांनी पकडले आहे. संशयित आरोपींकडून माहिती घेत अकरा मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. टोळीतील बहुतांश मुले दहावीची परीक्षा देत असून दोघे आठवी-नववीत आहेत.


नाशिकरोड बसस्थानकाच्या आवारात वाहन चोरताना त्यांना पोलिसांनी प्रत्यक्ष पकडले. बसस्थानकाच्या आवारातील सार्वजनिक शौचालयाजवळून सुधीर नामदेव धिवरे (47, नालंदा सोसायटी, जेलरोड) यांची मोटारसायकल (एम. एच. 15 पी 6511) चोरीस गेली होती. हवालदार दिनकर लवांड, अशोक साळवे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकात माळोदे, प्रशांत डांगळे, राजेंद्र मोजाड, महेश साळुंके, कय्युम सैय्यद यांनी पोलिस गस्तीदरम्यान त्या दुचाकीतून पेट्रोल चोरी करताना काही संशयितांना पकडले.


अशी आली चोरी उघडकीस
टोळीतील एकाने मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेजजवळून एक मोटारसायकल चोरली होती. महाविद्यालयीन तरुणांच्या ते लक्षात आले होते. मोटारसायकलचा क्रमांक पुसट करण्यात आला होता. संशयिताला जाब विचारला असता त्याने ‘तुम्ही कॉलेजला कसे येता ते पाहून घेतो’, अशी धमकी देत त्यांचे मोबाइलवर छायाचित्र घेतले. यामुळे संतापलेल्या युवकांनी संशयिताला थेट पोलिस ठाण्यात नेले. त्यामुळे टोळीच उघड झाली. संशयित अल्पवयीन व दहावीची परीक्षा देत असल्याने पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.

सापडलेल्या मोटारसायकल
संशयितांची चौकशी केली असता त्यांच्याकडून एमएच 46 टी 9681, जीजे 1 ईएफ 9335, एमएच 15 बीएफ 5583, एमएच 15 बीआर 2376, एमएच 15 व्हीएफ 2820, एमएच 15 सीएम 2157, एमएच 15 बीयू 5071, एमएच 15 एआर 372, एमएच 15 बीएफ 4195, एमएच 15 एए 9911 व एमएच 15 पी 6511 या क्रमांकांच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.