आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - पंचवटीतील रामवाडी येथील तरुणाचा खून प्रेमप्रकरणातून झाला असल्याचा कयास पोलिस अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. सोमवारी उदयनगर येथे डोक्यात व डोळ्यात गोळी झाडून प्रवीण ऊर्फ समीर हांडे या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित फरार असून, तपासासाठी चार पथके रवाना झाली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नील पवार, सागर वाघ, विकी चौधरी, दुर्गेश गवळी, सचिन चौधरी आणि मृत समीर हांडे हे सोमवारी मखमलबाद येथे रात्री उशिरापर्यंत बसलेले होते. मुख्य संशयित तुकाराम चोथवे, नीलेश नेरुळकर या दोघांनी गवळी व पवारला सांगून समीरला उदय कॉलनी येथे बोलावून घेतले. गवळी व पवारला मारहाण झाल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. त्याच वेळी चोथवे व नेरुळकर यांनी पिस्तुलातून समीरच्या डोक्यात गोळी घातली. त्यानंतर ते दोघेही फरार झाले. प्रेमप्रकरणातून हा खूून झाल्याचे चौघांनी चौकशीदरम्यान सांगितले. सहायक आयुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ निरीक्षक शांताराम अवसरे, निरीक्षक नरेंद्र पिंगळे तपास करीत आहेत.
चार पथके रवाना
फरार संशयित सराईत आहेत. दोघांचे मोबाइल बंद आहेत. दिंडोरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणी चार पथके रवाना करण्यात आली आहेत. काही माहिती प्राप्त झाली असून, लवकरच संशयित पकडले जातील. शांताराम अवसरे, वरिष्ठ निरीक्षक, पंचवटी पोलिस ठाणे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.