आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Nashik Municipal Corporation Politics

स्थायीवरून सेनेत दोन नगरसेवकांचे राजीनामा अस्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवाजी सहाणे - Divya Marathi
शिवाजी सहाणे

नाशिक - स्थायी समितीच्या दोन जागांसाठी पक्षाच्या विहित पद्धतीला डावलून र्मजीतील दोघांची संपर्कप्रमुखांकडे शिफारस करण्याचा प्रकार घडल्याची तक्रार करीत शिवसेनेच्या नाशिकरोड येथील दोन नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत थेट राजीनामा अस्त्र उगारले. जिल्हाध्यक्ष व महानगरप्रमुखांकडे तक्रारीनंतर रात्री उशिरापर्यंत त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते.


‘स्थायी’वरील सेनेचे दोन सदस्य निवृत्त होत असून, त्या जागी दोघांची निवड करण्यासाठी सेनेकडून इच्छुक आठ जणांची नावे महानगरप्रमुख तथा गटनेत्यांकडून संपर्कप्रमुखांना कळवली जाणार होती. त्यानंतर अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा राहणार आहे. मात्र, ही प्रक्रिया सुरू असताना हर्षा बडगुजर व वंदना बिरारी यांची शिफारस केल्याची चर्चा पसरली. ही बाब कळताच एक वर्षासाठी ‘स्थायी’वर सदस्य असलेले शिवाजी सहाणे व या जागेसाठी इच्छुक कोमल मेहरोलिया यांनी बंडाचे निशाण फडकविले. या दोघांनी सेना सोडल्याचे मेसेजही भ्रमणध्वनीवरून पसरू लागले. ही बाब कळताच महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दोघांची समजूत घातली.


पक्षप्रमुखांना निर्णय घेऊ द्या
‘स्थायी’च्या दोन जागांसाठी इच्छुक असलेल्या सर्वांची नावे पक्षप्रमुखांकडे पाठवून त्यांच्या आदेशाप्रमाणे पालन होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र तसे न करता संघटनेच्या प्रक्रियेत लुडबूड करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. शिवाजी सहाणे, नगरसेवक, शिवसेना