आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Netarland Consulate General, Industry

नाशिकमध्ये व्यवसाय वृद्धीसाठी नेदरलँड उत्सुक; शिष्टमंडळ येणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक परिसरात उद्योग उभारणी करण्यासाठी इच्छुक असल्याचे चीनने स्पष्ट केल्यानंतर आता नेदरलँडही नाशिकमध्ये व्यवसायवृद्धी करण्यासाठी उत्सुक आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नेदरलँडचे कौन्सुलेट जनरल तेथील उद्योजकांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळासह नाशिक भेटीवर येत आहेत.


अन्नप्रक्रिया उद्योगात नेदरलँड अग्रेसर असून, यासाठीच्या मशिनरी नेदरलँडमधून आयात करण्यावर भारतीय उद्योजकांचा भर असतो. नाशिक हा देशातील कृषी उत्पादनातील अग्रणी जिल्हा असल्याने आणि येथे पिकणार्‍या द्राक्षांपासून टोमॅटोपर्यंत सर्व पिकांवर प्रक्रिया करता येणार असल्याने नेदरलँडला नाशिकचे आकर्षण आहे. याआधीही नेदरलँडच्या दूतावासातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी येथील उद्योजकांशी चर्चा केली होती.


आदान-प्रदान वाढेल
केवळ नेदरलँडने त्यांच्याकडील मशिनरीज येथे विक्री करण्यावर भर न देता प्रत्यक्ष नाशिकमध्ये उद्योग सुरू करावेत, याकरिता तेथील उद्योजकांनाही आम्ही निमंत्रित करण्याचे आवाहन कौन्सुलेट जनरल यांना केले आहे. नेदरलँड शिष्टमंडळाच्या या भेटीनंतर मोठय़ा प्रमाणावर व्यवसायाचे आदान-प्रदान वाढविता येणार असल्याचे निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी यांनी सांगितले.