आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Nurshing Act, Nashik Municipal Corporation, Divya Marathi

पॅथोलॅब नोंदणीला आधार बायोवेस्टचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नर्सिंग अँक्टखाली पॅथोलॉजिस्टची नोंदणी करण्यात अडचणी येत असल्याची बाब लक्षात आल्याने आता महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने छोट्या रक्तसंकलन केंद्रांपासून बड्या पॅथोलॉजिस्टला आरोग्य विभागाकडे नोंदणी सक्तीची केली आहे. यासाठी बायोमेडिकल वेस्ट अर्थातच जैविक घनकचरा निर्मिती होत असल्याचे कारण देण्यात आले आहे.


सहा महिन्यांपूर्वी शहर व परिसरात डेंग्यूच्या चाचण्यांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाची नजर छोट्या रक्तसंकलन केंद्रांकडे वळली होती. त्यानंतर ‘दिव्य मराठी’नेही डेंग्यूच्या चाचण्या करण्याची शिफारस का केली जाते, याचा शोध घेतला. या शोधात ही धक्कादायक बाब उघड झाली होती. बडे पॅथोलॉजिस्ट 500 रुपयांत डेंग्यूची चाचणी करून देत असताना छोट्या रक्तसंकलन केंद्रांकडून 1200 रुपये रुग्णांकडून आकारले जात होते. त्यात सरळपणे 700 रुपयांचा कट ‘शिफारस’ करणार्‍यांना मिळत असल्यामुळे या चाचणीवर उड्या पडत असल्याचा संशय बळावला. दरम्यान, या प्रकरणाची इंडियन मेडिकल असोसिएशनने दखल घेत शहरातील डॉक्टरांना पत्र लिहून रुग्णांना केवळ बड्या मान्यताप्राप्त एम. डी. पॅथोलॉजिस्टकडेच पाठवावे, असे आवाहन केले होते.


दुसरीकडे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने अनधिकृत रक्तसंकलन केंद्रांवर कारवाईसाठी चाचपणी केली. मात्र, त्यासाठी प्रथम महापालिकेकडे त्यांची नोंदणी असणे गरजेचे होते. त्यासाठी नोंदणी सुरू केल्यावर पॅथोलॉजिस्ट संघटनेने यास हरकत घेऊन नर्सिंग अँक्टखाली पॅथोलॉजी व्यवसाय येत नसल्याचा दावा केला होता. त्यावर महापालिकेने आरोग्य संचलनालयाकडून मार्गदर्शन मागवले होते. मात्र, तेथूनही संभ्रमात भर टाकणारेच स्पष्टीकरण आल्यानंतर अखेर वैद्यकीय विभागाने आरोग्य विभागाच्या कोर्टात नोंदणीचा चेंडू टोलवला आहे. पॅथोलॉजीतील चाचण्यांमधून बायोमेडिकल वेस्टची निर्मिती होत असल्यामुळे त्यांनी महापालिकेकडे नोंदणी करावी, असे पत्र काढण्यात आले आहे. त्यानुसार, आता शहरातील पॅथोलॉजिस्टला नोंदणी करणे अनिवार्य ठरेल.


महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वरीलप्रमाणे पत्र पाठविण्यात आले असूनही शहरातील पॅथोलॉजिस्टकडून त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आतापर्यंत 150 पॅथलॅबनेच नोंदणी केली आहे. प्रतीक्षा आहे ती इतर लॅबधारकांकडून नोंदणीची.


पालिकेकडून पत्र
आरोग्य संचलनालयाकडून याबाबत मार्गदर्शन मागवण्यात आले. मात्र, तेथूनही संभ्रमात भर टाकणारेच स्पष्टीकरण आल्याने वैद्यकीय विभागाने आरोग्य विभागाच्या कोर्टात चेंडू टोलवला आहे. पॅथोलॉजीतील चाचण्यांमधून बायोमेडिकल वेस्टची निर्मिती होत असल्यामुळे त्यांनी नोंदणी करावी, असे पत्र काढले आहे.


पॅथोलॉजिस्ट अद्यापही उदासीन
बायोमेडिकल वेस्टमुळे आरोग्य विभागाकडे पॅथोलॉजिस्टने नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील पॅथोलॉजिस्ट किंबहुना लहान रक्तसंकलन केंद्रांकडूनही अद्याप पाहिजे तसा प्रतिसाद नाही. साधारण 150 लॅबनेच नोंदणी केली आहे. बायोमेडिकल वेस्टमुळे मात्र ही नोंदणी करणे पॅथोलॉजिस्टला बंधनकारक आहे. डॉ. सुनील बुकाने, आरोग्याधिकारी, महापालिका