नाशिक - पोलिस प्रबोधिनीत घातपाताचा कट रचल्याप्रकरणी लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी बिलाल ऊर्फ लालबाबा शेख, हिमायत बेग यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. याच गुन्ह्यातील संशयित व २६ / ११ च्या हल्ल्यातील आरोपी जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
नाशकात पाेलिस प्रबाेधिनीसह रेल्वेस्थानक, आर्टिलरी सेंटरसह गर्दीच्या ठिकाणी घातपात करण्याचा कट रचल्याप्रकरणी दहशतवादविराेधी पथकाने लष्कर-ए-ताेयबाचा अतिरेकी िबलाल शेख ऊर्फ लालबाबा याला सातपूरमधील शिवाजीनगर येथून २००९ मध्ये अटक केली हाेती. त्यापाठाेपाठ हिमायत बेग आणि अबू जुंदाल यांनाही याच गुन्ह्यात अटक करण्यात आली. या गुन्ह्यात दहशतवादविराेधी पथकाने तपास करून दाेन हजार पानांचे दाेषाराेपपत्र नाशिकच्या विशेष सत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्याची नियमित सुनावणी विशेष न्यायाधीश तंत्रपाळे यांच्यासमाेर सुरू झाली असून त्याच्या तारखा निश्चितीसाठी बुधवारी दाेघांना न्यायालयात हजर करण्यात अाले. मात्र, तांत्रिक कारणास्तव कुठलीही सुनावणी न हाेता २९ तारखेला पुढील सुनावणी ठेवण्यात अाली अाहे.
दरम्यान, याच गुन्ह्यात अबू जुंदाल याचा सहभाग स्पष्ट झालेला नसून त्याला जामिनावर मुक्त करण्याची मागणी त्याच्या वकिलाने केली अाहे. यावरदेखील गुरुवारी सुनावणी हाेणार आहे.
अबू जुंदालच्या अनुपस्थितीत निर्णय
जुंदाल हा मुंबईच्या २६/११च्या हल्ल्यातील मुख्य संशयित असून ताे िबलाल अाणि बेगच्या संपर्कात असल्याचे पुरावे एटीएसने न्यायालयात सादर केले अाहेत. तरीही या गुन्ह्यातून मुक्ततेसाठी त्याचे वकील बिपिन पांडे यांनी न्यायालयात अर्ज केला. दरम्यान, त्याला परकीय शक्तींकडून अपहरण व जिवे मारण्याची शक्यता असून त्यास कुठल्याही खटल्यासाठी अार्थर राेड कारागृहातून बाहेर नेऊ नये, असे आदेश यापूर्वीच न्यायालयाने दिले असल्याने त्यास हजर करता येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.