आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Rabies Dog, Killing, Divya Marathi

पिसाळलेल्या कुत्र्याला ठेचून केले ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लामखडेनगर व तारवालानगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने चार मुलांसह परिसरातील पाच ते सहा कुत्र्यांना चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी कुत्र्यास ठेचून ठार केले. शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दिंडोरीरोडवरील लामखडेनगर, तारवालानगर येथे दुपारी पिसाळलेल्या या कुत्र्याने धुमाकूळ घालत चार लहान मुलांना चावा घेतला. परिसरातील पाच ते सहा कुत्र्यांनाही त्याने चावा घेतला. पिसाळलेला कुत्रा सैरभैर पळत असल्याने व दिसेल त्याच्यावर हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. परिसरातील काही तरुणांनी कुत्र्यास घेरून काठय़ा-दगडांच्या साहाय्याने ठार केले. सुमारे एक तास कुत्र्याने परिसरात धुमाकूळ घातला होता. जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पालिका प्रशासनाने परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या कुत्र्यांपैकी तीन ते चार कुत्र्यांचा थोड्याच वेळात मृत्यू झाला. यापूर्वीही परिसरात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. पालिकेकडे तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढत चालला आहे. यातून गंभीर घटना घडण्याचा संभव असल्याने पालिकेकडून त्वरित कारवाईची मागणी होत आहे.
ते कुत्रेही पिसाळणार
पिसाळलेल्या कुत्र्याने पाच ते सहा कुत्र्यांना चावा घेतल्याने ते कुत्रेदेखील पिसाळतील. त्यामुळे या कुत्र्यांबाबत योग्य उपाय करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.