आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Raid Squad, Model Code Of Conduct, Divya Marathi

भरारी पथकांना कारवाईसाठीचे दिले धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आचारसंहितेत अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेल्या भरारी पथकांना त्यांची जबाबदारी, कामाचे स्वरूप समजून सांगत थेट कारवाई करण्याबाबतचेच धडे देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्ह्यातील 45 भरारी पथकांच्या अधिकारी कर्मचार्‍यांची बैठक घेत 5 मार्चपासून आतापर्यंत करण्यात आलेली कारवाईचा आढावा थेट जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांनीच घेतला.


भरारी पथकांची जबाबदारी निवडणुकीत अधिक आहे. त्यामुळे त्यांनी दक्ष राहून कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर त्वरित त्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विलास पाटील यांनी दिले.


पथकांना विविध माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. पथकांकडे वाहनांसह आवश्यक साहित्य आणि कर्मचारी आहेत की नाही याचीही माहिती या वेळी घेण्यात आली. त्याचबरोबर सहायक खर्च निरीक्षक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी नरेंद्र महाजन यांची नेमणूक करत त्यांनाही 28 मार्च रोजी येणार्‍या खर्च निरीक्षकांना सादर कराव्या लागणार्‍या खर्चाचे अहवाल तयार करण्याबाबत माहिती देण्यात आली.


असे असेल भरारी पथक
* कारवाईसाठी विधानसभा मतदारसंघानिहाय तीन-तीन भरारी पथकांची नेमणूक
* पथकांमध्ये पोलिस अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी, तीन बंदूकधारी, एक व्हिडिओ ग्राफर
* पथकांना रोज कारवाईचे अहवाल विशिष्ट स्वरुपात द्यावे लागणार