आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Rain, Onion, Hailstorm, Divya Marathi

चांदवड, मालेगावात अवकाळी पाऊस,कांद्याबरोबरच डाळिंबाचेही नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव/मनमाड - गारपिटीमुळे यापूर्वी रब्बीचे मोठे नुकसान झाले असून, अद्याप त्याची भरपाईही काही ठिकाणी मिळाली नसतानाच गुरुवारी पुन्हा अवकाळी पाऊस झाल्याने चांदवड व मालेगाव तालुक्यांतील शेतकरी चिंताक्रांत झाले. चांदवडला कांद्यासह डाळिंबाचे नुकसान झाले असून, तळवाडेत दोन जनावरे वीज पडून ठार झाली आहेत.


चांदवड तालुक्यातील दुगाव, कोकणखेडे, हरनूल, हरसूल, पिंपळगाव ढाबळी भागात गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास अर्धा तास बेमोसमी पाऊस पडला. कांद्याचे तसेच वादळामुळे डाळिंबाची फूलगळ झाल्याने नुकसान झाले. मोतीराम मंडलिक यांच्या एक लाखाच्या कांदा बियाण्याचेही नुकसान झाले. परिसरात वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वीजप्रवाह बंद करण्यात आला होता. अनेक घरांवरील पत्रे उडाले. लग्नाची दाट तिथी असल्याने अनेकांची दाणादाण उडाली. मनमाड शहरातही सायंकाळी ढगाळ वातावरण होते. रिमझिम पाऊस पडल्याने परिसरातील शेतकर्‍यांत भीती होती. दोन जनावरे ठार : मालेगाव तालुक्यातील तळवाडे व रावळगाव येथे गुरुवारी वादळी वार्‍यासह झालेल्या बेमोसमी पावसाने पाच ते सात घरांचे पत्रे उडाले, तर वीज पडून दोन जनावरे ठार झाली. तळवाडे येथे किरकोळ गारपीटही झाली. तळवाडेत बुधवारी सायंकाळीही पाऊस झाला होता. गुरुवारी दुपारी तासभर झालेल्या पावसात येथे वीज पडून काळू सखाराम पवार यांचा एक बैल व वासरू ठार झाले. वीज झाडावर कोसळल्याने झाडदेखील कोसळले. परंतु, मनुष्यहानी टळली. शहरातही सायंकाळी जोरदार वादळ आले होते.