आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Raped Woman In Nashik Road

नाशिकरोडला महिलेवर सामूहिक बलात्कार,अवघ्या 24 तासांत तीन संशयित ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - सोबत असलेल्या मित्राला ठार मारण्याची धमकी देत रोकडोबावाडी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय घटस्फोटित महिलेवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 24 तासांत तीनही संशयितांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आणि तिचा मित्र सागर हे बुधवारी सायंकाळी रोकडोबावाडी परिसरातील गणपती मंदिरानजीक फिरण्यासाठी गेले होते. त्याचवेळी तेथे आलेल्या तिघांनी संगनमत करून या दोघांना मारहाण केली. सागरच्या डोक्यावर दगड मारण्यात आला. दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली व सागरला ठार करण्याची धमकी देत त्यांनी महिलेवर बलात्कार केला. गुरुवारी सायंकाळी याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात महिलेने तक्रार दिली.


पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त संदीप दिवाण, सहायक आयुक्त डी. एस. स्वामी, सहायक उपायुक्त हेमराज राजपूत यांनी या तरुणीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.