आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Sunil Khanbahale Develop Spell Checker In Computer

मराठी विश्‍व: नाशिकच्या तरुणाने आणली मराठी स्पेलचेकर प्रणाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील महिरावणी या गावातील सुनील खांडबहाले यांनी विकसित केलेल्या पहिल्या मराठी भाषा शुद्धलेखन व स्पेलचेकर संगणकीय प्रणालीचे उद्घाटन झाले. मराठी लेखनाच्या शुद्धीकरणासाठी खांडबहाले यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेला हा प्रयत्न मराठी भाषेच्या विकासासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरेल, अशी आशा या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
‘डिक्शनरी मॅन’ म्हणून संबोधले जाणारे खांडबहाले यांनी दोन वर्षे अथक पर्शिम घेऊन या प्रणालीचा विकास केला आहे. 14 वर्षांपासून ते भारतीय भाषांमध्ये संशोधन करीत असून, या भाषांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांचे संवर्धन करीत आहेत. आतापर्यंत तब्बल 22 भारतीय भाषांमध्ये त्यांनी शब्दकोश निर्मिती करून ते संगणक, संकेतस्थळ, मोबाइल, टॅब्लेट तसेच एसएमएस स्वरूपात मोफत उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, संगणकावर मराठी लिहिताना अनेकदा अशुद्धता राहते. त्यातून अर्थाचा अनर्थही होतो. अनेक शब्द लिहिताना वेलांटी, उकार हे -हस्व की दीर्घ हेच कळत नाही. अनेकदा चुकीच्या पद्धतीने शब्द लिहिले जातात. त्यासाठी मराठी भाषेत सर्वांना वापरता येईल असे एकही स्पेलचेकर नसल्याची खंत कायम होती. त्या विचारानेच मी या प्रणालीची निर्मिती केली असून, ती कविर्शेष्ठ तात्यासाहेब शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रजांना अर्पण करतो, अशी भावना या वेळी खांडबहाले यांनी व्यक्त केली.


स्पेलचेकर प्रणालीचे वैशिष्ट्ये
भारतात मायक्रोसॉफ्ट विंडोज वापरण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यांनी ही प्रणाली प्रथम विंडोजसाठी तयार केली आहे. ती युनिकोडमध्ये आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये ज्याप्रमाणे इंग्रजी स्पेलचेकर वापरता येतो, त्याच धर्तीवर मराठी स्पेलचेकरची रचना करण्यात आली आहे. सुरुवातीला मूळ शब्द, विभक्ती प्रत्यय लागून तयार झालेले शब्द व शुद्धलेखन नियम आणि भाषा व्याकरण यानुसार शब्दांचा अंतर्भाव आहे. चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. त्यावर उजव्या बाजूने क्लिक करून योग्य शब्द निवडता येईल. त्यात नवीन शब्द टाकण्याची सुविधाही आहे. पुढील तीन-चार महिन्यांत सर्वांसाठी उपलब्ध होणार असून, इच्छुकांना www.khandbahale.com या संकेतस्थळावर मागणी करता येईल.