आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Tenth Board Examination Seat Arrangement

शहरातील दहावीच्या परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने राज्यभरात घेण्यात येणारी इयत्ता दहावीची (बोर्डाची) परीक्षा 3 मार्चपासून सुरू होत आहे. त्याची आसन व्यवस्था मंडळाने जाहीर केली असून, विद्यार्थ्यांना आपल्या केंद्रावर परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 2 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता पाहता येणार असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.


कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय (केंद्र 1000) गंगापूर येथील आसन व्यवस्था
केबीएच विद्यालय : डी 000001 ते डी 000325, मराठा हायस्कूल : डी000326 ते डी001100, रचना विद्यालय : डी001101 ते डी 001700, सिल्व्हरओक हायस्कूल : डी001701 ते 002155 आणि डी500001 ते डी 500109 पर्यंतचे क्रमांक.


निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल केंद्र 1020 ‘इ’
होरायझन अँकेडमी : डी006600 ते डी 006749, निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल : डी 006750 ते डी006915, आणि डी 500598 ते डी 500644, नवरचना विद्यालय : डी 006916 ते डी 007215, किलबील, सेंट जोसेफ स्कूल : डी 007216 ते डी 007515, डॉन बॉस्को : डी 007516 ते डी 007829 पर्यंतचे क्रमांक असतील.


आदर्श माध्यमिक विद्यालय केंद्र नंबर 1033
आदर्श माध्यमिक विद्यालय केंद्र 1 : मराठी माध्यम डी 011209 ते डी 011508, केंद्र -2 मराठी डी011509 ते डी 011683, इंग्रजी माध्यम डी 011684 ते डी 011778, रिपीटर विद्यार्थी मराठी माध्यम डी 500954 ते डी 501001


श्री डायाभाई देवसी बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज केंद्र क्रमांक 1015
श्री वायडी बिटको गल्र्स हायस्कूल मराठी (डी004410 ते डी 004553), इंग्रजी माध्यम (डी005574 ते डी005822), श्री डीडी बिटको बॉइज हायस्कूल नाशिक-1 मराठी (डी004553 ते डी 004853, श्री डीडी बिटको बॉइज हायस्कूल नाशिक-2 मराठी (डी004854 ते 004972, डी 006525 ते डी 006599, डी 500447 ते डी 500597), सेंट फ्रान्सिस हायस्कूल इंग्रजी माध्यम (डी 004973 ते डी005273, डी 005274 ते डी 005573), रमाबाई आंबेडकर शाळा उर्दू माध्यम (005823 ते 006113) नॅशनल उर्दू हायस्कूल (डी006114 ते डी 006524) पर्यंतचे क्रमांक.


आज केंद्र संचालकांची बैठक
नियोजनासाठी नियुक्त केंद्र संचालकांची बैठक शुक्रवारी सकाळी 10 वाजता आयोजित केली आहे. नाशिक जिल्ह्याच्या संचालकांची रावसाहेब थोरात सभागृहात, धुळ्याची कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेत, नंदुरबारची एस. जी. र्शॉफ हायस्कूल आणि जळगाव जिल्ह्यातील केंद्र संचालकांची बैठक आर. आर. विद्यालय येथे होणार आहे.