आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पाणीपट्टीची बिले मिळत नसल्यास लोकांनी विचारावे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘बिल मिळत नसेल तर लोकांनीच विचारायला आले पाहिजे’, असा अजब युक्तिवाद महापौर यतिन वाघ यांनी बुधवारी केला.सातपूर विभागातील पाणीपट्टीची 7500 बिले प्रलंबित असल्यामुळे करवसुलीचे उद्दिष्ट घटल्याने त्यास जबाबदार कर्मचार्‍यांचे वेतन रोखण्यासंदर्भात दाद मागण्यासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांचे शिष्टमंडळ आले होते. या वेळी महापौरांनी बिले न वाटण्यामागचे कारण विचारल्यावर कर्मचार्‍यांनी करवसुली विभागात नवीन असल्याचे, तसेच संगणक-प्रिंटरचा तुटवडा असल्याचे उत्तर दिले. महापौरांनी संगणक विभागाच्या अधिकार्‍यांना नवीन साहित्य तातडीने देण्यास सांगितले.


मनसेचेच नगरसेवक सलीम शेख यांनी प्रलंबित देयके खूप असल्याने ते वाटता वाटता नाकीनऊ येत असल्याचे सांगितले. त्यावर महापौरांनी ‘कर्मचार्‍यांकडून वाटप झाले नाही तर, लोकांनी बिले मिळत नसल्याचे विचारायला हवे’ असा युक्तिवाद केला. लोकांनी स्वत: संपर्क साधल्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट नसल्यामुळे बिल मिळूच शकले नसल्याचा दावा शेख यांनी केला. वसुलीशिवाय वेतन मिळणार नसल्याची भूमिका महापौरांनी घेतली.


आहे जनता, कशाला चिंता : घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी अंदाजपत्रकात प्रोत्साहनपर योजना राबवण्याकरिता प्रशासन आग्रह धरत असताना नागरिकांनीच कर भरण्यासाठी पुढाकार घ्यावा, या भूमिकेमुळे सत्ताधार्‍यांचे उत्तरदायित्व जनतेशी की प्रशासनाशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.