आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत नळजाेडण्या अाता अधिकृत करणार; 21 अाॅक्टाेबर अंतिम तारीख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील अनधिकृत नळजोडण्या अधिकृत करण्यासाठी शुक्रवार (दि. ८)पासून पुढील ४५ दिवसांसाठी महापालिकेने माेहीम सुरू केली असून, या मुदतीत दंड भरून अनधिकृत नळजाेडणी अधिकृत करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध असेल. दरम्यान, घरगुती वापराचे अनधिकृत नळजोडणी पाचशे, तर बिगर घरगुती अनधिकृत जोडणी दोन हजार रुपये दंड भरून नियमित हाेईल. 
 
पालिका क्षेत्रात पाणीगळतीचे प्रमाण ४० टक्के इतके असून, त्याचा शाेध घेण्यासाठी जललेखापरीक्षणही सुरू अाहे. दुसरीकडे महापाैर रंजना भानसी यांनी महापाैर परिषदेदरम्यान ग्वाल्हेरच्या धर्तीवर अनधिकृत नळजाेडणी नियमित करून त्यायाेगे पालिकेचे उत्पन्न वाढवणे गळती कमी करण्याची धडपड चालवली हाेती. या प्रस्तावास धोरणात्मक निर्णयाद्वारे नुकतीच मंजुरी घेण्यात अाली. त्यानुसार सप्टेंबरपासून अनधिकृत नळजाेडणी नियमितीकरणासाठी ४५ दिवस म्हणजेच २१ ऑक्टोबरची मुदत असेल. दरम्यान, मुदतीनंतर मात्र अनधिकृत नळजाेडण्या शाेधण्यासाठी माेहीम राबवली जाईल. त्यात जे दाेषी सापडतील त्यांच्याकडून ते २५ हजार रुपये बिगर घरगुती नळजोडणीकरिता १० ते ५० हजार रुपये शुल्क दंड आकारला जाणार आहे. नळजोडणीधारक प्लंबरविरोधात पाणीचोरीचा गुन्हा दाखल हाेईल. 
 
असा साधा संपर्क 
नळजाेडणी नियमितीकरणासाठी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग सहाही विभागीय कार्यालयांत माहिती मिळेल. त्यासाठी सातबारा उतारा, बांधकाम परवानगी प्रमाणपत्र, पूर्णत्वाचा दाखला, सोसायटी, अपार्टमेंटचे अध्यक्ष सदस्यांचे संमतीपत्र, हमीपत्र, आधारकार्ड, तसेच झोपडपट्टीसाठी सर्व्हिस चार्जेस, वीजबिल पावती, आधारकार्ड हमीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...