आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
येवला - कॉँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष हे जीव वाचविणारे पक्ष आहेत. अन्न सुरक्षा कायदा व राजीव गांधी जीवनदायी योजना आघाडी सरकारने आणल्या. आम्ही मफलरने गळा आवळून जीव घेणारे नाहीत, अशी टीका करीत राज ठाकरेंचे वक्तव्य हे विकृतपणाचे लक्षण असल्याची टीका पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे केली.
येवला मतदारसंघ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात मॉडेल ठरल्याचे सांगत भुजबळ म्हणाले, पूर्वी गावात 5 लाखांचे काम तत्कालीन आमदाराने आणले तरी कौतुक व्हायचे. परंतु, आज पाच कोटी रुपयांची कामे आणली तरी कौतुक वाटत नाही. तालुक्यातील मंदिर परिसरातील विकासकामांसाठी पर्यटन विभागामार्फत सुमारे 45 कोटी रुपयांचा निधी आणल्याचे भुजबळ या वेळी म्हणाले. येवला शहराचा कायापालट हा सर्वांना भुरळ घालणारा ठरत असून, उच्च पदस्थांच्या बैठकांमध्ये देखील येवल्याच्या विकासकामांची चर्चा होत असते, असेही भुजबळ या वेळी म्हणाले. कोटमगावात पर्यटन विकास योजनेंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन आडगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन त्यांनी केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.