आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक - वादग्रस्त शहर विकास आराखड्याला जबाबदार नगररचना विभागाच्या सहायक संचालक सुलेखा वैजापूरकर यांना परस्पर कार्यभार घेतल्याच्या मुद्यावरून नगरसेवक आक्रमक झाल्यावर महापौर यतिन वाघ यांनी तातडीने कार्यमुक्त करून शासन सेवेत पाठविण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे, तर त्यांच्याकडील सरकारी वाहन जमा करावे तसेच वेतनही काढू नये, अशा सूचना लेखा विभागाला केल्या.
माजी उपमहापौर देवयानी फरांदे यांनी वैजापूरकर यांनी आठ दिवसांपूर्वी परस्पर कार्यभार स्वीकारल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, वैजापूरकर यांच्या जागी नवीन अधिकार्याची नेमणूकही झाली. तरीही चार महिने रजा उपभोगून त्या परस्पर रुजू कशा झाल्या, तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाईच्या निर्णयाचे काय झाले, असे विचारत या प्रकरणी प्रशासनाकडे माहिती मागितली आहे. मात्र, आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे याबाबत अधिकृतपणे सांगता आले नाही. दादासाहेब गायकवाड सभागृहात वैजापूरकर यांचे कामकाज सुरू असून, त्यासाठी सरकारी वाहनाचा वापर होत असल्याचेही सांगितल्यावर नगरसेवक आक्रमक झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.